गणेशोत्सवात महामार्गावर सी.सी.टी.व्ही.कॅमे-यांची नजर,सुविधा व मदत केंद्रही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी हि प्रशासनाला मोठी डोकेदुखी असते.यासाठी अवजड वाहनांना या काळात बंदी करण्यात आली आहे तरीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे तरीही अनेक बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होत असतात. यावर पोलिस यंत्रणेने सीसीटिव्हीचा उपाय शोधला आहे

महाड - कोकणात गणेशोत्सवासाठी येणा-या गणेश भक्तांपुढे कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी महामार्गावर सी.सी.टी.व्ही.कॅमे-यांची नजर राहणार आहे.महामार्गावर आठ महत्वाच्या ठिकाणी अठरा कॅमेरे बसवले जाणार आहेत.याशिवाय प्रवाशांसाठी सुविधा व मदत केंद्रहीअसणार आहेत.

गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी हि प्रशासनाला मोठी डोकेदुखी असते.यासाठी अवजड वाहनांना या काळात बंदी करण्यात आली आहे तरीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे तरीही अनेक बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होत असतात. यावर पोलिस यंत्रणेने सीसीटिव्हीचा उपाय शोधला आहे. महामार्गावर हमरापूर फाटा,पेण खोपोली बायपास,रामवाडी चौकी,इंदापूर स्टँड,पाली जोड रस्ता ,महाड शहर, नातेखिंड व विसावा काँनर येथे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले जाणार आहेत.या ठिकाणाहून वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार असुन कोंडी डाल्यास तातडीने त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.

सुविधा व मदत केंद्र
गणेश भक्तांच्या सुविधेसाठी पोलिस उपअधिक्षक,निरिक्षक,उपनिरिक्षक,कर्मचारी कर्मचारी सज्ज ठेवलेले जाणार आहेत.होमगार्ड,राज्य राखिव दल.शिघ्र कृती दल,महामार्ग पोलिस बंदोबस्तासाठी सज्ज ठेवले आहेत.बिनतारी संदेश यंत्रणा व वाहनेही दिमतीला असणार आहेत. महामार्गावर हमरापूर फाटा, वाकण फाटा,पाली शहर,पेण हायवे पोलिस चौकी वडखळ.सुकेळी खिंड,माणगाव,लोणेरे फाटा व नातेखिंड या नऊ ठिकाणी मदत केंद्र उभी केली जाणार आहेत येथे प्रवाशांना आवश्यक ती मदत व आपत्काळात क्रेन,जेसीबी व रुगणवाहिका उपलब्ध होईल.रुग्णवाहिका,डाँक्टर व परिचारिका तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रही या काळात सज्ज ठेवले जाणार आहे.