समस्याग्रस्तांना माणसात राहायला शिकवलं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

गुहागर - माझ्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांना माणसात राहायला शिकविलं. देवावर गाढ भक्ती करण्याचा मंत्र दिला. परमेश्वराने त्यांच्या अडचणी सोडविल्या. यापेक्षा वेगळी सिद्धी माझ्याकडे नाही, असे विनयशील प्रतिपादन केशव जोशी यांनी केले. ते ‘गुरुर्ब्रह्मा’च्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

गुहागर वरचापाट येथे जोशी यांच्या निवासस्थानी आज सकाळी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. केशव जोशी म्हणाले की, माझ्याबाबत असं  काही लिहिलं जातयं असे समजले असते तरी विरोधच केला असता. कारण आजवर मोहात पडण्याच्या प्रत्येक क्षणी मी सावध होतो. माझ्या गुरुंनी मला माणसात राहायला व देवावर श्रद्धा ठेवायला शिकविलं. ही शिकवण मी इतरांना दिली. ज्यांना काही सांगितलं त्यांनी ते ऐकलं, त्यामुळे परमेश्वराने त्याच्या समस्या सोडविल्या. मी निमित्तमात्र होतो. पत्नीने आणि मुलानेही या जगण्यात साथ दिली.

पुस्तिकेतील केशव व सौ. योगिनी जोशी यांच्यावरील लेख पाहून दोघांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. जोशी यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या अडचणी सुटल्या असे मुंबई, पुणे, ठाणे आणि मिरजमधील काहीजण, गुहागरमधील २५ जण कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रास्ताविकानंतर केशव आणि सौ. योगिनी जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यांच्याविषयीच लेख असल्याचे कळल्यावर दोघांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. विवेकानंद जोशी, पुण्यातील सौ. नमिता यादव यांनी जोशींविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स