फत्तेगडाची संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

हर्णै - दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हर्णै-फत्तेगड येथील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे दोन घरांचे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झालेली नाही. गेले चार दिवस मुसळधार पाऊस  पडत आहे. 

सोमवारी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना फत्तेगडाची संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीला लागूनच देवचंद्र दोरकुळकर यांचे घर आहे. भिंत कोसळल्यामुळे दोरकुळकर यांच्या घराच्या मागील बाजूस जाणाऱ्या पायऱ्याना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या घरांना धोका आहे. 

हा प्रकार घडला त्यावेळी दोरकुळकारांच्या घरामध्ये सर्व महिला होत्या. घरातील पुरुष मासेमारीसाठी बोटीवर गेले होते. या घटनेमुळे फत्तेगड येथील ग्रामस्थ घाबरले आहेत. कारण ही भिंत कोसळल्यामुळे उर्वरित धक्‍क्‍याला तडे गेले आहेत. तसेच जवळपासच्या घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे गडावरील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे. गेली अनेक वर्षे फत्तेगड ग्रामस्थांकडून मजबूत संरक्षक बंधाऱ्यांची मागणी केली जात आहे. संबंधित शासन याकडे लक्ष देत नाहीत. घरातील पुरुष मासेमारीला बोटीवर जातात. महिला अशा प्रसंगांना कसे तोंड देणार अशी भीती एका मच्छीमार महिलेने सांगितली. तलाठी पी. जी. साळवी यांनी पंचनामा केला. तातडीने घर खाली करून स्थलांतर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील धोकादायक घरांना तहसीलदारांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Web Title: konkan news harne Wall