तीन टप्प्यात कोसळणारा जामदा धबधबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

राजापूर - पाचल परिसर (ता. राजापूर) आणि घाटमाथा परिसरामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरागांचे पावसाळ्यामध्ये हिरवा शालू पांघरल्याने निसर्गसौंदर्य अधिकच खुलते. या पर्वतरांगांमधून जामदा नदीवरील सुमारे बाराशे फूट उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे पर्वतराजीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते.

आजवर हे स्थळ दुर्लक्षितच राहिले आहे. तालुक्‍यामध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये कोसळणारे धबधबे आहेत. त्याला काजिर्डा येथील जामदा नदीवरील सुमारे बाराशे फुटावरून संततधार कोसळणारा धबधबा अपवाद ठरतो. कोल्हापूर घाटमाथ्यावरून वाहत येणाऱ्या जामदा नदीवरील हा धबधबा काजिर्डा येथे कोसळतो. त्या ठिकाणी घनदाट झाडीचा फारसा परिसर नाही. या भागामध्ये लोकवस्ती असून धबधब्याच्या पसिरामध्ये लोकांचा नेहमीच वावर असतो. बाराशे फुटांवरून हा धबधबा कोसळत असला, तरी तीन टप्प्यामध्ये धबधबा कोसळतो. धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दोन तासांची पायपीट करावी लागते. मात्र जाताना निसर्गसौंदर्याचा अनोखा खजिना न्याहाळण्याची पर्वणी साधता येते. धबधब्याच्या ठिकाणी जाणे म्हणजे गड चढण्याची जणूकाही अनुभूती येते. अन्य धबधब्यांसारखा हा धबधबा 
धोकादायकही नाही.

Web Title: konkan news jamada waterfall