जिल्ह्यात भाज्यांचे दर दुपटीने वाढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कणकवली - राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाची झळ आज सहाव्या दिवशी जिल्ह्याच्या भाजी व्यापारावर दिसून आली आहे. बेगमीसाठी कांद्याचा दर १० रुपये वरून आज २० रुपयांवर गेल्याने साठवणूक करण्यासाठी गृहिणींच्या डोळ्यात कांदा पाणी आनणार आहे. 

कणकवली - राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाची झळ आज सहाव्या दिवशी जिल्ह्याच्या भाजी व्यापारावर दिसून आली आहे. बेगमीसाठी कांद्याचा दर १० रुपये वरून आज २० रुपयांवर गेल्याने साठवणूक करण्यासाठी गृहिणींच्या डोळ्यात कांदा पाणी आनणार आहे. 

राज्यातील शेतकरी संपात जिल्ह्यातील शेतकरी उतललेला नाही. किंबहुना बेळगाव भागातून मोठ्या प्रमाणात भाजी-फळांची आवक झाल्याने दरावरही फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र राज्यात संप जसा चिघळत चालला आहे, तशी त्यांची झळ आत कोकणलाही बसण्याची शक्‍यता आहे. गेल्या सहा दिवसांत भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र आजच्या कणकवलीच्या मंगळवारच्या आठवडा बाजारात कोल्हापूर भागातील काही भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने बेगळवातून आलेल्या भाजीचे दर वाढले आहेत. 

येथील बाजार जर सोमवारी सांयकाळी कोल्हापूर, राधानगरी, गगनबावडा या भागातील भाज्या विक्रीसाठी येतात; तर मंगळवारी पहाटे बेळगाव, कारवार, निपाणी या भागातील भाजी कणकवलीत दाखल होते. तसेच कोल्हापूर येथील भाजी मंडईतून कांदा आणि बटाटे येथे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असते. आज मात्र कोल्हापूर येथील व्यापारी कमी प्रमाणात कोकणात उतरले. त्याचा परिणाम कांदे २० रुपये किलोवर पोहचले होते. येथील काही व्यावसायिकांनी कांद्याची साठवण मे महिन्यातच केली आहे. हा कांदा सध्या ग्राहक पावसाळी साठवणुकीसाठी ५० ते ८० किलो अशा प्रमाणात खरेदी करतो. गेल्या आठवड्यात ठेवणीच्या कांद्याचा दर हा १० ते १२ रुपये किलो असा होता. मात्र आजच्या आठवडा बाजारात ठेवणीचा कांदा १५ ते १८ रुपये आणि किरकोळ कांदा २० रु. किलोवर पोहोचला होता. 

कोबीचा कांदा १० रुपये नग आज २५ ते ३० रुपये, फ्लॉवर २० रूपये नग ३० ते ४० रुपयेला विकला जात होता. पालेभाज्यांचे दरही वाढले होते. कोथिंबीरचे जुडी १० रुपयांवरून २० रुपयांवर पोहोचली होती. बटाट्याचा दर मात्र २० ते २५ रुपये किलो होता.