भंगारमधील ट्रकमध्ये सापडले 10 किलो सोने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

महाड - अलिशान मोटारीतून जाणाऱ्या सराफाला प्राप्तिकर अधिकारी असल्याची बातावणी करून लुटणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या लुटीतील दहा किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांनी भंगारातील ट्रकमध्ये हे दागिने लपवले होते. या प्रकरणातील एक आरोपी फरारी आहे. 

सराफ व्यावसायिक प्रकाश शहा हे कुटुंबासह शनिवारी (ता. 19) पुणे ते निपाणी असा प्रवास करत होते. खंबाटकी घाटात चौघांनी त्यांची गाडी अडवली. प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी शहा यांच्याकडील दहा किलो सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर भोरमार्गे वरंध घाटात गाडी आणून किल्ली व सोने घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण आणि शिरवळ खंडाळा (जि. सातारा) पोलिसांनी एकत्रित कारवाई करून शंतनू नितीन डांगे (वय 32), राहुल बाळकृष्ण धवले (वय 28) व महेश साळुंखे (30) यांना अटक केली आहे. 

चोरलेले सोने लपविलेल्या ठिकाणी आरोपींना घेऊन आज पोलिस महाडमध्ये पोचले. दुपारी कांबळेतर्फे महाड या गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या भंगारातील ट्रकमधून पोलिसांनी दागिने जप्त केले.

टॅग्स