राणेंची मोर्चेबांधणी पुर्ण; आता फक्त प्रतिक्षा मुहूर्ताची

narayan rane
narayan rane

सावंतवाडी: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. या महीन्याच्या अखेरीस श्री. राणे आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून भाजपवासी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या मागण्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. यामुळे आता भाजपात जाण्याच्या तयारीला लागा, असे आदेश जिल्ह्यातील समर्थकांना देण्यात आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे; मात्र जाण्यासाठी राणे कोणता मुहूर्त काढतात याबाबत; मात्र कार्यकर्त्यात उत्सुकता आहे.

काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी मुख्यमंत्री श्री. राणे हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेले अनेक महीने सुरू होती. चतुर्थीच्या आधी काही दिवस या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. 27 ला श्री. राणे हे भाजपात जातील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून मांडण्यात आला होता. राणेंच्या मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत तसेच त्यांना योग्य ते पद दिले जाण्याचे अद्याप आश्‍वासन देण्यात आले नाही असे कारण पुढे करुन त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते; मात्र राणे कुंटुंबियांकडुन अधिकृत कोणताही खुुलासा करण्यात आला नव्हता. राणेंच्या पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात सत्यनारायणाची पुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी आपल्यासोबत येणार्‍या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी राणेंनी चाचपणी केल्याची चर्चा होती.

कार्यकर्त्यांकडुन मिळालेल्या माहितीनुसार राणेंचा भाजप प्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. त्यासाठी राणे समर्थकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असुन येत्या काळात आपण भाजपात जाण्यासाठी तयार रहा, असे आदेश राणे कुटुंबियांकडुन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घेतलेल्या भेटीनंतर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रवेश निश्‍चित मानला जात आहे, असे कार्यकर्त्याकडुन खासगीत सांगण्यात येत आहे.

नारायण राणे देणार आज राजीनामा ?
भाजप प्रवेशापुर्वी उद्या (ता. 30) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे, असे विश्‍वसनीय सुत्रांकडुन सांगण्यात आले.

90 टक्के काँग्रेस राणेंसोबत जाणार ?
भाजपात जाण्याचा निर्णय राणेंनी घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समर्थकच जातील अशी शक्यता होती; मात्र वस्तूस्थिती लक्षात घेता 90 टक्के काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाणार आहेत, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत जुन्या काँग्रेसच्या निष्ठावंतांना संधी देवून त्यांना निवडून आणण्यात आले होते. त्यामुळे ते सर्व राणेंसोबत राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com