केसरकर आपण आपली पाठ थोपटून घेतात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

राज्यात आणी केद्रात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे त्या माध्यमातून जिल्ह्याचा सोन्या सारखा विकास झाला पाहीजे मात्र हा विकास करण्यास केसरकर कमी पडले. जिल्ह्यात रस्त्याचा आणी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्याला श्री केसरकरच जबाबदार आहेत. त्यांनी आपली पाठ थोपटून घेण्याच्या पलीकडे आज पर्यत काहीही केले नाही त्यामुळे ते काय बोलतात याला महत्व नाही

सावंतवाडी : नारायण राणेंच्या मंत्रीपदावर बोलणार्‍या पालकमंत्री दिपक केसरकर यांनाच आत्ता पुन्हा मंत्रीपद मिळते का हे प्रश्‍नचिन्ह आहे त्यामुळे बाजारात तुरी त्यामुळे आत्ताच कशाला मारामारी असा प्रकार करण्यापेक्षा  काही दिवस थांबा अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज येथे केली 
दरम्यान जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भाजपा सरकारने करोडो रुपयाचा निधी  दिला आहे मात्र केसरकर प्रशासन राबविण्यास कमी पडले असून आपली पाठ थोपटण्यात धन्यता मानत आहेत असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री केसरकर यांनी राणे यांची इडीकडुन चौकशी सुरू आहे त्यामुळे कोणी सांगितले म्हणून त्यांना मंत्रीपद मिळणार नाही अशी टिका केली होती याला श्री जठार यांनी प्रत्यूत्तर दिले ते म्हणाले राणेंच्या मंत्रीपदाबाबत वरिष्ट स्तरावर निर्णय होणार आहे तो काय होणार आहे याबाबत आपण आत्ताच काही सांगू शकत नाही त्यामुळे बाजारात तुरी आणी आत्ताच कशाला मारामारी अशी परिस्थिती निर्माण करणे कठीण आहे काय होईल हे काही दिवसात स्पष्ट होणार आहेत त्यानंतर काय ते बघू मंत्रीमंडळ विस्तारात भाजपा आणी शिवसेना आपापल्या मात्र केसरकर यांना आता पुन्हा मंत्रीपण मिळेल की नाही यात शंका आहे त्यामुळे त्यांनीच आपले इश्‍वरी संकेत तपासावेत, अशी टिका जठार यांनी यावेळी केसरकर यांच्यावर केली. राज्यात आणी केद्रात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे त्या माध्यमातून जिल्ह्याचा सोन्या सारखा विकास झाला पाहीजे मात्र हा विकास करण्यास केसरकर कमी पडले. जिल्ह्यात रस्त्याचा आणी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्याला श्री केसरकरच जबाबदार आहेत. त्यांनी आपली पाठ थोपटून घेण्याच्या पलीकडे आज पर्यत काहीही केले नाही त्यामुळे ते काय बोलतात याला महत्व नाही 

केसरकर आपण आपली पाठ थोपटून घेतात 

यावेळी श्री जठार म्हणाले आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहोत लाडके आहोत असे अनेक वेळा केसरकर सांगतात मात्र तसे कधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे का असा प्रतिप्रश्‍न श्री जठार यांनी उपस्थित पत्रकारांना केला जिल्ह्यात येवून फक्त आपली पाठ थोपटून घेण्याचे काम श्री केसरकर करीत आहेत असे जठार यांनी सांगितले

Web Title: konkan news: narayan rane deepak kesarkar