घटस्थापनेच्या दिवशी निर्णय जाहिर करणार : नारायण राणे

narayan rane
narayan rane

कुडाळ (सिंधुदुर्ग): नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. 21) मी कोठे जाणार याचा निर्णय जाहीर करणार आहे. मग कोण कोणाला धक्का देतो हे पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी मी आणी माझे दोन्ही पुत्र राजकारणात राहणार आहोत. फक्त तुम्ही माझ्या पाठिशी रहा. राज्यातील 31 जिल्हे माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे आता कोणाला घाबरत नाही. उघडपणे भूमिका घेणार, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज (सोमवार) येथे मांडली.

काँग्रेसमधून जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आज येथे झालेल्या मेळाव्यात राणे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी नारायण राणे म्हणाले, 'भाषणाच्या सुरवातीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत असा उल्लेख करून त्यांनी भाषणाला सुरवात करीत जो पर्यंत मी सामंत यांना काढत नाही तो पर्यंत काँग्रेस काय कोणी काही करू शकत नाही. आजची गर्दी बघून वेगळा आवेश पहायला मिळाला. ही संधी देणा-यांचे आभार त्यांना राणेंना डिवचले म्हणजे काय होते ते कळले नाही, अन्यथा त्यांनी असा निर्णय घेतला नसता. तीन महिने आपली चर्चा होती पण कोणी काँग्रेसच्या नेत्यांनी मला विचारल नाही. कोणाची हिम्मत झाली नाही, पण जिल्हाध्यक्षला काढले आणि विकास सावंत याने काय चांगले काम केले याचे उत्तर द्यावे. मात्र, झालेली कारवाई चुकीची आहे, मात्र आमची पदे आहेत. त्यांनी पुढे अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली त्यांच्या नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे, असे सांगून आपल्या ताब्यात असलेल्या सत्तास्थानाची लिस्ट वाचून दाखवत ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना बाजूला करून चव्हाण यांनी काय साधले? असा प्रश्न राणे यांनी केला.

चव्हाण हे माझे मित्र आहेत. परंतु, राजकारणात काही गोष्टी पटत नाहीत. मी काय भूमिका घेणार याबाबत राजकीय उत्कंठा वाढविणार आहे. टप्प्याटप्प्याने माहीती देणार. माझ्या विरोधात काम करणा-यामध्ये विकास सावंत, सुधीर सावंत यांचे नाव. मीच कोणी पक्षाचे सदस्य व्हायचे नाही, असे जिल्ह्यातील पदाधिका-यांना सांगितले. राणेंच्या विरोधात डोके वर काढणे एवढे सोपे नाही. अनेकांनी प्रयत्न केला पण आता कुठे आहेत ते माहीत नाही असे सांगून काँग्रेस देशात आणी राज्यात संपतय तरी हा माणूस पदावर आहे. पक्ष संपविण्याची त्यांनी सुपारी घेतली. दिल्लीत सुध्दा आपली दखल घेतली जाते. सगळेच आपल्याला घाबरतात, असे सांगून जिल्यातील काम करणारे लोक सोडून बाहेरचे लोक घेवून पक्ष वाढवणार.'

यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले, '2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतरचा उत्साह आज पहायला मिळाला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा आमच्यावर आकस आहे. राणेंवर अन्याय होतोय असे सर्वांना वाटतय, म्हणून ते आम्हाला हवेहवेसे वाटतायत. मात्र, दलवाई यांनी रत्नागिरीची वाट लावली त्यांनी आपल्या निधीतील पंधरा टक्के वाटा मागतायत. आमचे त्यांचे काही वाकडे नव्हते त्यांचा काय संबंध त्यांची लायकी काय हे मला माहीत आहे. राणेंनी राज्याचे नेतृत्व केले याला काय माहीत, असे सांगून विकास सावंत यांनी ग्रामपंचायत लढवून दाखवावी, असा इशारा दिला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांना घरी बसविल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. शेवटी आमचा साहेब म्हणजे आम्ही आहोत ते कोठेही असो आमचा विजय निश्चित आहे.'

आमदार नितेश राणे यांनी विकास सावंत यांच्यावर टीका केली. आमच्या पलीकडे एक तरी कार्यकारिणी बोलून दाखवावी. स्वतः च्या मुलाला ते रोखू शकले नाही. हुसेन हलवाई नक्की दलवाई आहेत का हलवाई? असा प्रश्न करीत काँग्रेस संपविण्याचे काम केले आहे. अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना तत्कालिन परिस्थितीत त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांचा काँग्रेसने अपमान केला होता त्याचा वचपा ते काढण्यासाठी काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता ग्रामपंचायतीच्या निवडणूका सहज होणार, त्यामुळे चव्हाण यांचे आभार मानत येणा-या निवडणुकीत 325 ग्रामपंचायतीत विजय मिळवून दिवाळी भेट देवू. असा शब्द देतो, असे नितेश राणे म्हणाले.

यावेळी सतिश सावंत, दत्ता सामंत, रेश्मा सावंत, रणजित देसाई, संजू परब, विशाल परब, सुदन बांदीवडेकर, अशोक सावंत, गोटया सावंत आदी उपस्थित होते

ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुध्दा लढणार...
यावेळी श्री राणे म्हणाले काही झाले तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका समर्थ विकास पॅनल या नावावर लढणार. 25 ग्रामपंचायती जिंकून देऊन विरोधकांना जागा दाखवून दया, असे सांगून पुढील निर्णय जाहिर करे पर्यंत तुमच्या कामाला लागा. कोणी आदेश दिला तर राणेंचा आदेश आहे, असे सांगा. कोणी पदावर दावा करीत असेल तर काय करायचे हे तुम्हाला सांगायला नको, असेही राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com