पोलिस कर्मचाऱ्यांना ड्यूटीची माहिती मिळणार मोबाईलवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मालवण - जिल्हा पोलिसांनी हायटेक बनताना आपल्या कामकाजात चांगली सुधारणा करण्यास सुरवात केली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या ड्यूटीची माहिती थेट मोबाईलवर समजणार आहे. पोलिस प्रशासनाकडून अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील दोन-दोन कर्मचाऱ्यांना या नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. 

पोलिस यंत्रणा दिवसेंदिवस हायटेक बनत आहे. काही दिवसांपूर्वीच ई-पेट्रोलिंग जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर आता सर्व पोलिस कर्मचारी वर्गाच्या ड्यूट्या ऑनलाइन केल्या जाणार आहेत. याचे मॉनिटरिंग पोलिस ठाण्यातून होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात याची माहिती दिसणार आहे. ड्यूटी ऑनलाइन होणार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्‍यक प्रशिक्षणही देण्यात आले. 

ड्यूटीची माहिती देणारा संदेश सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. या अद्ययावत सॉफ्टवेअरच्या चाचण्या सध्या सुरू असून, वरिष्ठ स्तरावरून १ ऑगस्टपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आतापर्यंत अस्तित्वात असलेले हजेरी दफ्तर इतिहासजमा होईल.