सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदी शिवसेनेचे विक्रांत सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सावंतवाडीः माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत विकास सावंत यांची शिवसेनेने सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज ही नियुक्ती जाहीर केली.

श्री. सावंत हे काँग्रेसच्या घराण्यातील असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मातोश्रीवर आपल्या समर्थकांसमवेत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना कोणते पद मिळणार याबाबत उत्सुकता होती. काहींनी युवकचे पद मिळेल असा अंदाज वर्तविला होता. शिवसेनेने त्यांना बेसिकचे पद देऊन संघटनात्मक ताकद दिली आहे.

सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदावर नियुक्ती श्री. राऊत यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली. शिवसेनेने या मतदारसंघात पहिल्यांदाच हे पद जाहीर केले आहे. याबरोबरच शैलेश परब यांची सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे. या विधानसभेच्या सहसंपर्कप्रमुखपदी प्रकाश परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.