पर्यटन क्षेत्रात जिल्हा प्रगतीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करून आर्थिक जीवनमान उंचावल्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटन व सिंधुदुर्ग यांचं नातं अधिक दृढ आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात प्रगतीचा चढता आलेख ठेवला आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीिक्षतकुमार गेडाम, अप्पर पोिलस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.  श्री. केसरकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील शेतकरी पारंपारिक भात शेतीला फाटा देऊन आता श्री  पध्दतीने भात लागवड करण्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. गतवर्षी श्री पध्दतीने भात लागवडीचे एक हजार हेक्‍टर क्षेत्र जिल्ह्यात होते. यंदाच्या वर्षी २५०० हेक्‍टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड झाली आहे. गेल्या काही वर्षात फळझाड लागवडीच प्रमाण अत्यल्प होत. तथापि जिल्हा प्रशासन, कृषी व जिल्हा परिषद यांच्या प्रयत्नाव्दारे यंदाच्या वर्षी ८५०० हेक्‍टर क्षेत्रावर फळझाड लागवड होत आहे. कोल्हापूर पध्दतीच्या २९ बंधाऱ्याची कामे पुर्ण करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ३०८ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली.’’ स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा तसेच या महिन्यात येणाऱ्या गणशोत्सवाच्या शुभेच्छा श्री. केसरकर यांनी यावेळी दिल्या.

या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास आमदार वैभव नाईक, श्री. प्रभाकर सावंत जिल्हास्तरीय अधिकारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण झाले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.

Web Title: konkan news sindhudurg nagari deepak kesarkar