दूरसंचारची सेवा सुधारा - सुरेश प्रभू

दूरसंचारची सेवा सुधारा - सुरेश प्रभू

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात वारंवार खंडीत होणारी दूरसंचार सेवा सुधारावी व आवश्‍यक तो कर्मचारी वर्ग तातडीने भरावा, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना दिले आहे. सेवा अधिक चांगली व्हावी यासाठी ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’सारखे पर्याय करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री सिन्हा यांना जिल्ह्यातील अडचणी सविस्तर पत्राद्वारे विशद केल्या आहेत. वादळी वारे अथवा तत्सम नैसर्गिक आपत्ती आल्यावर लगेच दूरसंचारचे नेटवर्क खंडीत होते. यामुळे जिल्ह्यातील सर्वच स्तरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहिली असता येथे कायमस्वरूपी पर्याय निर्माण करणे आवश्‍यक आहे. यामध्ये ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ व ‘बेस ट्रान्सीवर स्टेशन’ यासारख्या तांत्रिक सुधारणा प्राधान्याने पूर्ण कराव्यात. तसेच कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, अशा सूचनाही त्यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा मिळाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com