टीईटी परीक्षा २२ ला होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

अडीच हजार विद्यार्थी बसणार - तीन माध्यमातून परीक्षा
सिंधुदुर्गनगरी - शिक्षकपदाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी.एड., बी.एड. उमेदवारांसाठीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २२ ला होणार आहे. या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाचे मिळून २ हजार ७१५ उमेदवार प्रविष्ट होणार आहेत.

अडीच हजार विद्यार्थी बसणार - तीन माध्यमातून परीक्षा
सिंधुदुर्गनगरी - शिक्षकपदाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी.एड., बी.एड. उमेदवारांसाठीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २२ ला होणार आहे. या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाचे मिळून २ हजार ७१५ उमेदवार प्रविष्ट होणार आहेत.

डी.एड. व बी. एड. झालेल्या उमेदवाराला २०१३ पासून ही पराक्षा अनिवार्य आहे. राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणक्रमावर आधारीत दोन पेपर घेतले जातात. परीक्षा २२ ला होणार असून जिल्ह्यात सावंतवाडी व कणकवली तालुक्‍यातील पाच परीक्षा केंद्रे निश्‍चित केली आहेत. एस.एम. हायस्कूल कणकवली, विद्यामंदिर कणकवली, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी, आरपीडी हायस्कूल सावंतवाडी या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सकाळी १०.३० ते १ या वेळेत पेपर क्रमांक एक तर दुपारी २ ते ४.३० या वेळेत पेपर क्रमांक दोनची परीक्षा होणार आहे.

पेपर क्रमांक एकसाठी मराठी माध्यमाचे १ हजार ५८१, इंग्रजी माध्यमाचे २२, उर्दू माध्यमाचे २५ असे एकूण १ हाजर ६२८ उमेदवार प्रविष्ट होणार आहेत. पेपर क्रमांक दोनसाठी मराठी माध्यमाचे १ हजार ३९, इग्रजी माध्यमाचे ३४ आणि उर्दू माध्यमाचे १४ असे एकूण १ हजार ८७ उमेदवार प्रविष्ट होणार आहेत.

राखीव प्रवर्गासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ५५ टक्के तर अन्य प्रवर्गातून ६० टक्के गुण मिळविणारे उमेदवार शिक्षकपदासाठी पात्र समजले जाणार आहेत; मात्र ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला नोकरी मिळेलच याची हमी नसल्याने यापूर्वी ही परीक्षा पास (उत्तीर्ण) झालेले हजारो उमेदवार अद्यापही नोकरीच्या परीक्षेत आहेत. शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

कोकण

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने...

03.12 AM

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...

03.12 AM

सावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार...

02.12 AM