वेंगुर्ले पालिका इमारतीला गळती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

वेंगुर्ले - शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या पालिकेच्या मुख्य बाजारपेठ इमारतीवरील भागात असलेल्या शिवाजी सभागृहात छप्पराखालील कौले फुटून पावसाळी पाण्याची गळती सुरू झाली आहे. प्लािस्टक बंदीत नंबर एकवर असलेल्या येथील पालिकेला ही गळती रोखण्यासाठी प्लािस्टक कापडाचा आधार घेऊन संपूर्ण छप्परावर प्लािस्टक कापड घालण्याची पाळी आली आहे.

पालिकेच्या मूळ मार्केटच्या इमारतीत पावसाळी गळती गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यात व्यवसाय करणारे, विविध वस्तू विक्रेते, व्यापारी गाळेधारक असून अनेकवेळा पालिकेकडे पावसाळी पाण्याची गळती बंद करण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करीत केले जात आहे. आता तर ही गळती पालिकेच्या शिवाजी सभागृहात जेथे कौन्सिल सभा होतात तेथेच सुरु झाली आहे. त्यामुळे छप्परावर प्लािस्टक कापड घालून पाणी गळती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.