कोयनेत 600 मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

"कोयनेच्या परिसरात सोलर प्रकल्प मंजूर झाल्याची चर्चा केवळ राष्ट्रीयस्तरावर आहे. आमच्याकडे अद्याप पत्रव्यवहार झालेला नाही. हा प्रकल्प झाल्यास पावसाळा वगळता आठ महिने त्याचा राज्याला फायदा होईल.‘‘
- ज्ञानदेव बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन विभाग. 

चिपळूण - कोयना धरणाच्या जलाशय परिसरात तरंगत्या राष्ट्रीय सौरऊर्जा प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पातून 600 मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे. 6 हजार कोटी खर्चाचा हा प्रकल्प राज्याचा मानबिंदू ठरणार आहे. 

 
कोयना प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता 1960 मेगावॉटइतकी आहे. कोयना धरणातील पाण्यावर ही वीजनिर्मिती अवलंबून आहे. कमी पावसामुळे अनेक वेळा धरण भरत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात प्रकल्पाचे काही टप्पे बंद ठेवावे लागतात. प्रामुख्याने चौथा टप्पा बंद केल्यानंतर विजेची टंचाई निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपायोजना सुरू आहेत. हेळवाक येथे एक टीएमसी क्षमतेचे छोटे धरण बांधून कोयना धरणातील पाणी या धरणात आणायचे. तेथे वीजनिर्मिती करून पुन्हा हे पाणी कोयना धरणात सोडायचे अशा पद्धतीने सहाव्या टप्प्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्यात चौथा टप्पा बंद पडल्यानंतर वीजनिर्मितीची टंचाई भासू नये म्हणून कोयनेच्या परिसरात सौरऊर्जेद्वारे 600 मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे.
 

राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाचा हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कोयना प्रकल्पाची व्याप्ती वाढणार आहे. प्रदूषणमुक्त वीजनिर्मितीची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची निर्मिती होणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या सोलर पॅनेल प्रकल्पाच्या माध्यमातून कोयना वीज प्रकल्प राज्याला 600 मेगावॉट वीज देईल. राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाने या प्रकल्पाची रचना केली आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पॅनेल उभारावी लागतात. त्यासाठी मोठ्या जागेची गरज असते. एका तळावर एवढी मोठी जमीन मिळणे अवघड आहे. सोलर पॅनेल प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी करता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे विस्ताराने मोठा असलेल्या कोयना जलाशय परिसरात या प्रकल्पाची निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या प्रती मेगावॉट विजेसाठी 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. 600 मेगावॉटचा विचार करता 5 हजार कोटींची तरतूद सरकारकडून करण्यात येणार आहे.

 

कोकण

कणकवली - राज्य शासनाने पवित्र (Portal for Visible to all Teacher Recruitment)  या संगणक प्रणालीद्वारे राज्यातील सर्व...

12.42 PM

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार...

12.42 PM

रत्नागिरी - हमारी युनियन हमारी ताकद.. हम सब एक है.. असा नारा देत ईपीएस (१९९५) कर्मचाऱ्यांच्या गेली २१ वर्षे होत असलेल्या...

12.36 PM