'मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे 'फ्लॉप शो''

Nitesh Rane Datta Samant
Nitesh Rane Datta Samant

कुडाळ : राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कुडाळातील सभा 'फ्लॉप शो' ठरली. यामुळे भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला पत्रकार परिषदेत आमदार नीतेश राणे यांनी दिला.

मालवण येथे मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी मांडलेले प्रश्‍न मार्गी न लावता तेच जनतेसमोर ठेवले. या सर्व प्रश्‍नांवर माजी मुख्यमंत्री 17 च्या कुडाळ येथील जाहीर प्रचार सभेत देतील, असे कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष दत्ता सामंत यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्‍वभूमीवर तसेच आज झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत श्री. राणे, श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. सामंत म्हणाले, ''कुडाळ नवीन डेपोच्या भव्य जागेत कॉंग्रेसची श्री. राणेंच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेला माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षांपूर्वी मालवण येथे सभेला आले होते. त्यावेळी त्यांनी विकासात्मक प्रश्‍न सांगितले. त्याचा पाढा आज पुन्हा कथन केला. एकही प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला नाही. या सर्व प्रश्‍नांना आमचे नेते नारायण राणे सडेतोड उत्तर देणार आहेत. 17 ची जाहीर सभा ही आगळीवेगळी असेल. जिल्हा परिषदेवर आघाडीच्या दोनसह 50 तर पंचायत समितीच्या 100 ही जागांवर आम्ही विजयी होणार. या जिल्ह्यात गेल्या दोन-अडीच वर्षांत विधानसभा, लोकसभा निवडणुका झाल्या. आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी सातत्याने कॉंग्रेसवर खोटे आरोप केले. खासदारांनी 400 कोटींचा केलेला भ्रष्टाचार आता उघड झाला आहे. जिल्ह्यात पालकमंत्री आहेत की नाही हे समजत नाही. त्यामुळे मागील चूक येथील जनता करणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकणार. जिल्हा परिषदेचा अतिशय सुंदर कारभार पाच वर्षांत झाला. स्वच्छता अभियानात जिल्हा देशात प्रथम आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव झाला. 21 ला होणाऱ्या निवडणुकीचा जाहीरनामा श्री. राणेंच्या हस्ते जाहीर केला जाणार आहे.'' 

या वेळी नगराध्यक्ष विनायक रामे, दिनेश साळगावकर, सुनील भोगटे, आबा धडाम, संध्या तेरसे, राकेश कांदे, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, सायली मांजरेकर, विद्याप्रसाद बांदेकर, सरोज जाधव उपस्थित होते. 

ट्रेनिंग द्यायची तयारी 
आज मुख्यमंत्र्यांची सभा जिल्ह्यात झाली. मुख्यमंत्री हे पक्षाचे नसतात, राज्याचे असतात. त्यांच्या सभेला 2500 माणसे येतात, हा त्यांचा अपमान आहे. भाजपच्या नेतेमंडळींनी याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला देत या सभेला आम्हाला माणसे द्यायला सांगितली असती तर राज्याचे मंत्री म्हणून आम्ही बिनशर्त मदत केली असती, असा टोला आमदार राणे यांनी हाणला. सभा काय असते ते आम्ही 17 ला दाखवू. तुम्ही आलात तर ट्रेनिंग द्यायला तयार आहोत, असे ही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com