पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन तरुणांचे श्रमदान

दापोली - श्रमदानातून सलग समतल चराचे काम करताना मिलिंद खानविलकर, प्रफुल्ल केळकर.
दापोली - श्रमदानातून सलग समतल चराचे काम करताना मिलिंद खानविलकर, प्रफुल्ल केळकर.

खेर्डीतील आदर्श : बोअरवेलचे पुनर्भरण सुरू; पाणी फाउंडेशनपासून घेतली प्रेरणा
दापोली - पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यातील ३० तालुक्‍यांमध्ये श्रमदानातून पाणलोट अभियान राबवले जात असून, या उपक्रमाने प्रेरित होऊन खेर्डी (ता. दापोली) येथील उच्चविद्याविभूषित शेतकरी मिलिंद खानविलकर आणि त्यांचे सहकारी प्रफुल्ल केळकर यांनी गावात श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यास सुरवात केली आहे.

दापोलीपासून पाच किमीवर खेर्डी आहे. फेब्रुवारीपासूनच येथे पाणीटंचाई जाणवते. त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

खेर्डीच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्‍यक पाणी गावातील अनेक भागात उपलब्ध होत नाही. गावातील सार्वजनिक आणि खाजगी विहिरी, बोअरवेल तीव्र उन्हात झपाट्याने आटू लागतात. एप्रिलपासून भूगर्भातील पाण्याची पातळी खूप खाली जाऊन ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गेली अनेक वर्षे सुरु असलेला हा प्रकार खानविलकर आणि त्यांचे सहकारी अनुभवत आहेत. गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे  आवश्‍यक होते. मात्र यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचे होते. गावातील देऊळवाडीतील ग्रामस्थ सुधाकर केळकर यांच्या घराशेजारी असणाऱ्या तीस गुंठे क्षेत्रात घरगुती वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. या बोअरवेलमधून मार्च अखेरीस पाणी मिळणे बंद होते. या जमिनीत केळकर पावसाळ्यात नाचणीचे पीक घेतात.

बोअरवेलचे पाणी वर्षभर मिळवण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे आवश्‍यक असल्याचे मिलिंद खानविलकर यांनी केळकर यांच्या निदर्शनास आणून दिले आणि यासाठी स्वतः श्रमदान करण्याचे निश्‍चित केले. गेले आठ दिवस रोज सकाळी ६ वाजता खानविलकर आणि केळकर कामाच्या ठिकाणी हजर होऊन एक सलग समतल चराचे काम पूर्ण करीत आहेत. श्रमदानातून सुरु असलेल्या या कामाची माहिती कृषी सहाययक विनोद म्हस्के याना मिळताच त्यांनी आपले सहकारी गोसावी यांच्या सोबत कामाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान केले.

या परिसरात सलग समतल चर काढल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरी आणि  बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढेल. शासकीय योजना आणि मदतीवर अवलंबून न राहता श्रमदानातून लोकांनी जलसंधारणाची कामे आपापल्या परिसरात केली पाहिजेत.
- मिलिंद खानविलकर, खेर्डी, दापोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com