दरड कोसळल्याने मालवणात घरे धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

मालवण- देवली-वाघवणेपाठोपाठ, बिळवस, मसुरे मायनेवाडी, तळाणीवाडी येथील डोंगर खचून दरड कोसळल्याने तेथील घरे धोक्‍यात आली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास घरांवर दरड कोसळून मोठा गंभीर प्रसंग उद्‌भवण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. 

जिल्ह्यात या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्‍यात झाला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात पूरस्थितीही निर्माण झाली आहे. यंदा देवली-वाघवणे येथे प्रथम डोंगर खचण्याची घटना घडली. डोंगरावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवाहामुळे तसेच पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डोंगर खचण्यास सुरवात झाली. 

डोंगराच्या पायथ्याशी काही ठिकाणी संरक्षक भिंतीही उभारण्यात आल्या आहेत; मात्र पाण्याच्या वेगामुळे त्या खालील माती खचल्याने त्याही जमीनदोस्त झाल्या. परिणामी पायथ्याशी असलेल्या घरांवर दरड कोसळून जीवितहानी घडण्याची शक्‍यता आहे. देवली-वाघवणे येथील डोंगर धोकादायक बनल्याने पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या सहा कुटुंबांतील सदस्यांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे; मात्र त्यांच्या घरांना धोका आहे. दोन दिवसांपूर्वी मसुरे-मायनेवाडी, तळाणीवाडी येथेही दरड कोसळून दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. 

कोकण

आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना  गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे...

01.48 PM

सुरक्षा कडक - कोस्ट गार्ड, मत्स्य, बंदर विभागही सामील रत्नागिरी - जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी आणि भक्कम होणार...

01.45 PM

गणपतीपुळे - फळांवर प्रक्रिया करून बनवलेल्या उत्पादनांवरील १२ टक्के जीएसटी कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे वित्त व नियोजन...

01.45 PM