फोंडाघाट येथे वस्तीत आलेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

फोंडाघाट येथे वस्तीत आलेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

पाण्यासाठी वनवन; ग्रामस्थांते प्रयत्न ठरले अपूरे

कणकवली: जंगलातील पाणवटेकोरडे पडल्याने पाणी आणि भकक्षाच्या शोधात वस्तीत धुसलेल्या सातमहीण्याच्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. फोंडाघाट येथील ग्रामस्थानी त्या बिबट्याला वाचविण्यासाठी केलेलप्रयत्न मात्र अपूरे ठरले. वनविभागाचे कर्मचारी वेळच पोहचू न शकल्याने भूकेनेव्याकूळ झालेल्या बिबट्याच्या बछड्याचा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मृत्यू ओढवला.

कणकवली तालुक्‍यातील फोंडाघाट येथील सह्याद्रीच्या पायथ्याशी वरवडेकरवाडीत आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 महिन्याचे बिबट्याच्या मादीजातीचे पिल्लू वस्तीत आले होते. दिवसा ढवळ्या फोंडाघाट वरवडेकरवाडी येथील बाबू सावंत यांच्या पाठीमागील परसबागेत हा बिबट्या आढळून आला. पाण्याच्या शोधार्थ हा बिबट्या आला होता. पाणी आणि भूकेमुळे अस्वस्थ झाले हे पिल्लू होते. ग्रामस्थांनी त्याला कोंबड्याच्या झापाखाली बंदिस्त केले. याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी बऱ्याच कालावधीनंतर दाखल झाले. मात्र, बिबट्याला उपचारासाठी नेण्यासाठी त्यांच्याकडे छोटा पिंजरा नव्हता. त्यामुळे तेथील एका ग्रामस्थाकडे छोटा पिंजरा असल्याने तो आणण्यासाठी वॉचमनला पाठविले होते. यावेळी बिबट्याच्या बछड्याला बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

भितिने बिबट्याचा पिल्लाला अशक्तपणा आला होता.त्यात बिबट्याच घटनास्थळी मडत्यू झाला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनपाल नाना तावडे यांनी मृतबिबट्यावा फोंडा वनपालयात कार्यालय आणले. तेथे पंचनामा केला. यावेळी पशूधन विकास अधिकारी डॉ.तुषार वेर्लेकर, वनरक्षक सत्यवान सुतार, वनरक्षक छाया गावडे, अनिता इप्पर आदी उपस्थित होते. पशूधन अधिकारी श्री. वेर्लेकर म्हणाले, हे बिबट्याचे छोटे पिल्लू सात महिन्याचे मादी जातीचे आहे. शरीरातीलपाणी कमी झाल्यामुळे आणि ते त्याच्या आईपासून कळपातून चुकल्यामुळे त्याचा भुकेने आणि त्याला पिण्यासाठी पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झाला.

दरम्यान वनविभागाचे वनरक्षक सत्यवानसुतार म्हणाले, या परिसरातील जंगलमय भागात सध्या पाण्याचा अभाव आहे.अलीकडे 11 मे ला या भागाची पाहणी केली होती. त्या परिसरात दुरवर एकपाणवठा आहे. त्याला रेडेकोंडअसे नाव दिले आहे. या भागात जंगलीजनावरांना नैसर्गिक पाणी मिळते. तेथे बिबटे आणि अन्य जंगली प्राणी पाण्यासाठी जातात. अन्य भागात मात्र जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून कडक उन्हामुळे पाणवटे कोरडे पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com