विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

राजापूर - रात्री मांजराचा पाठलाग करताना बिबट्याची मादी विहिरीत पडली. तालुक्‍यातील खिणगिणी गावी ही घटना घडली. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले मालक आज घरी परतल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाने मादीला सुखरूप बाहेर काढले. गेल्या काही महिन्यांत विहिरींत बिबट्या पडण्याची ही तिसरी घटना आहे.

शनिवारी पाध्ये कुटुंबीय घरी परतले. दुपारी एकच्या दरम्यान पाध्ये यांना विहिरीतून जोरजोरात आवाज आला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता बिबट्या आढळला. विजय पाध्ये यांनी तत्काळ राजापूर वन विभागाचे वनपाल सागर गोसावी यांना माहिती दिली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बिबट्याचे वय एक ते दीड वर्षे आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या जखमा झालेल्या नाहीत. मादी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Web Title: leopard life saving