रत्नागिरी तालुक्यात बिबट्याच्या बछड्याचा मुक्त संचार

रत्नागिरी तालुक्यात बिबट्याच्या बछड्याचा मुक्त संचार

रत्नागिरी - तालुक्यातील पावसनजीकच्या गणेशगुळे गावात मादी बिबट्या व तिच्या बछड्याचा मुक्त संचार सुरू आहे. मंगळवारी (ता. 11) रात्री साडेसातच्या सुमारास दुचाकीस्वाराला बछडा दिसला.

पहाटे आगरगुळे येथील खुराड्यातील दोन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. आठ दिवसांपूर्वी एका पाडीवरही बिबट्याने हल्ला केला होता. यामुळे आगरगुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मंगळवारी रात्री गणपती मंदिराकडून आगरगुळे येथील घरी जाणार्‍या एक दुचाकीस्वाराने उतारात बिबट्याचा बछडा पाहिला. या बछड्याची उंची सुमारे दीड ते दोन फूट असून तो मजबूत बांध्याचा आहे. त्याचे वय सुमारे सहा ते बारा महिने असावे. गाडीच्या हेडलाईटमुळे या बिबट्याने तिथून झाडीझुडपात पोबारा केला. मात्र बछडा असल्याने जवळपास मादी बिबट्या असण्याची शक्यता असल्याने दुचाकीस्वाराने तेथून धूम ठोकली.

गणेशगुळे गावात अनेक वर्षे बिबट्याचा संचार आहे. गेल्या वर्षी शिंदेवाडी येथे सकाळी एसटीची वाट पाहणार्‍या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. या भागात दुचाकीस्वाराचा पाठलागही केला होता. आता पुन्हा मादी बिबट्या व तिचा बछडाही फिरत आहे. जिथे बिबट्या दिसला तिथून जवळच गावातील सर्व वाड्यांना मध्यवर्ती असणारी जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा आहे. आता गणेशोत्सवाची शाळेला सुटी आहे, मात्र त्यानंतर दररोज शाळेत पायी जाणारे विद्यार्थी आहेत. त्यांनाही बिबट्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com