पंचवीस दिवसांनंतरही एटीएमबाहेर रांगा कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

रत्नागिरी - पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 25 दिवसांनंतर आता चलन देवघेवीची स्थिती सुधारू लागली आहे. बॅंकिंग व्यवहारावर आलेल्या नव्या मर्यादांमुळे अद्यापही ताण आहे. याचा परिणाम एटीएम केंद्रांबाहेर लांब रांगा लागण्यात होत आहे; मात्र नोटांचा साठा पुरेसा नसल्यामुळे एटीएम केंद्र लगेचच बंद होत असल्याने नागरिकांची निराशा होत आहे.

नोटा रद्दमुळे बॅंकिंग व्यवहारांवर बराच ताण होता. शहर परिसरासह ग्रामीण भागातही बॅंकिंग व्यवहारासाठी रांगा लागल्या होत्या. एटीएम केंद्रातही गर्दी होत होती; मात्र त्यानंतर नव्या नोटांचा भरणा झाल्यानंतर बॅंकिंग व्यवहारात सुधारणा झाली. आरबीआयने आता कितीही रुपये काढता येतील असे जाहीर केल्याने ही रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. एटीएममधूनही दिवसाला केवळ अडीच हजार रुपयेच मिळत असल्यामुळे रोजच्या व्यवहाराची जुळवाजुळव करताना सामान्य माणसाची अडचण होत आहे. एटीएममधून दोन हजारांची नवी नोट मिळत असल्यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या कायम आहे. सार्वजनिक क्षेत्रात जुन्या नोटा वापरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जुन्या नोटा बदलून देण्याची सुविधा बंद करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांची नियमित चलनाची समस्या अद्यापही कायम आहे. गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी सुट्टी आल्यामुळे बॅंकिंग व्यवहार बंद होते. सोमवारी बॅंक उघडल्यानंतर पुन्हा व्यवहारासाठी नागरिकांनी बॅंकांमधून गर्दी केली होती; मात्र व्यवहारांमध्ये मर्यादा असल्यामुळे मोठ्या व्यावसायिकांचे चलनवलन व्यवस्था अद्यापही कोलमडलेली आहे.

कोकण

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक,...

11.24 AM

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य कणकवली / सावंतवाडी -...

07.24 AM

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद...

05.51 AM