शोधायला गेला बॉम्ब; सापडली दारू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

यावेळी बसस्थानकावर असलेल्या बाकड्यांच्या खाली दोन मोठ्या पिशव्या आणि दोन बॅगा आढळून आल्या. याची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली; मात्र दारू वाहतूक करणारा संबंधित व्यक्ती दिसला नाही.

सावंतवाडी - बॉम्ब शोधक पथकाकडून येथील बस स्थानकाच्या आवारात केलेल्या तपासणीत चक्क गोवा बनावटीची दारू आढळून आली. यात 14 हजार रुपयांच्या दारूचा समावेश आहे.

ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील बसस्थानकावर घडली; मात्र संबधित संशयित पळून जाण्यास यशस्वी झाला. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. ओरोस येथील बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संजय कातीवडे हे आपले सहकारी हवालदार शामसुंदर देसाई, मिनाक्षी जोशी आणि चैताली बंडकर यांच्या समवेत निवडणुकीच्या येथील बसस्थानक परिसराची तपासणी करीत होते.

यावेळी बसस्थानकावर असलेल्या बाकड्यांच्या खाली दोन मोठ्या पिशव्या आणि दोन बॅगा आढळून आल्या. याची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली; मात्र दारू वाहतूक करणारा संबंधित व्यक्ती दिसला नाही. यामुळे पोलीसांकडून ती दारू जप्त करण्यात आली.

कोकण

सावंतवाडी : शहराच्या बाहेर महामार्गावर प्रवाशांना सोडणाऱ्या खासगी बसचालकांना दणका देण्यासाठी सावंतवाडी तालुका...

08.57 AM

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा...

01.45 AM

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला...

01.24 AM