एसटीला ट्रकची धडक; तीन प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

महाड - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.29) सायंकाळी महाबळेश्वरहून ठाण्याला जात असलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.

महाड - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.29) सायंकाळी महाबळेश्वरहून ठाण्याला जात असलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.

बससमोर मिनीडोर रिक्षा व ट्रेलर उभे होते. याच दरम्यान मागून येणारा ट्रक बसवर धडकला. या अपघातात बसमधील विराज गणपत शिर्के (वय 27, महाबळेश्वर), सचिन अनंत अवेरे (वय 27, कळवा) आणि सुनंदा संतोष सकपाळ (वय 33, महाबळेश्वर) हे तीन प्रवासी जखमी झाले. त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कोकण

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता.18) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक...

04.36 PM

मंडणगड : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून तालुक्यातील भारजा, निवळी नद्या धोक्याची पातळी...

04.24 PM

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून...

02.18 PM