चवदार तळ्यात तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

महाड - येथील चवदार तळ्यात शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या अठरावर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सायंकाळी 4 वाजता बाहेर काढण्यात आला. राहिल इस्माईल जोगीलकर असे त्याचे नाव आहे.

महाड - येथील चवदार तळ्यात शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या अठरावर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सायंकाळी 4 वाजता बाहेर काढण्यात आला. राहिल इस्माईल जोगीलकर असे त्याचे नाव आहे.

तो महाड तालुक्‍यातील राजेवाडीचा रहिवासी होता. तो दाभोळ येथील मदरशात शिक्षण घेत होता. सुटीत दोन दिवसांसाठी तो राजेवाडीला आला होता. मित्रांसोबत तळ्यात उतरल्यावर तो बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु खोल पाण्यात असल्याने तो बुडाला.

घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यावर नगर परिषद कर्मचारी; तसेच दासगाव व नडगाव येथील भोई समाजाच्या स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स