महिलादिनी जागृती फेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सावंतवाडी - जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ’तर्फे येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ’तर्फे महिलांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम घेतले जातात. आज येथे ‘सकाळ’चे वृत्तपत्र विक्रेते एन. जे. वझे यांच्या हस्ते महिलांना गुलाबपुष्प व ‘सकाळ’च्या अंकाचे वाटप करण्यात आले. 

हा उपक्रम वझे यांच्या स्टॉलजवळ करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांनी उपक्रमाचे कौतुक केले. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी ‘सकाळ’ने उचललेले पाऊल राज्याला वेगळ्या उंचीवर नेणारे आहे, असे गौरवोद्‌गार या वेळी उपस्थित महिलांनी काढले. शहरातील वुमेन्स कॉलेजतर्फे महिला दिनानिमित्त जागृती फेरी काढण्यात आली. या वेळी महिला सबलीकरणाविषयी विविध घोषणा देण्याबरोबरच फलकही झळकविण्यात आले. या उपक्रमातही ‘सकाळ’ने सक्रिय सहभाग घेतला. या वेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण प्रतिनिधी नाथा कदम, सुभाष तोरसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Mahiladiva Awareness Round