मालवणात रोटरी क्‍लबतर्फे मुलांना दफ्तरांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मालवण : ग्रामीण भागातील मराठी शाळेतील मुलांना चांगल्या सोयी मिळाव्यात या उद्देशाने येथील रोटरी क्‍लबच्या वतीने कुंभारमाठ मराठी शाळेतील मुलांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी येथील रोटरी क्‍लबच्या वतीने नेहमीच सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन माजी अध्यक्ष महादेव पाटकर यांनी या वेळी दिले. रोटरी क्‍लबच्या वतीने मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येईल, यासाठी मार्गदर्शनवर्ग घेण्यात येणार आहेत, असे रोटरी क्‍लबचे अध्यक्ष विनय गावकर यांनी सांगितले.

मालवण : ग्रामीण भागातील मराठी शाळेतील मुलांना चांगल्या सोयी मिळाव्यात या उद्देशाने येथील रोटरी क्‍लबच्या वतीने कुंभारमाठ मराठी शाळेतील मुलांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी येथील रोटरी क्‍लबच्या वतीने नेहमीच सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन माजी अध्यक्ष महादेव पाटकर यांनी या वेळी दिले. रोटरी क्‍लबच्या वतीने मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येईल, यासाठी मार्गदर्शनवर्ग घेण्यात येणार आहेत, असे रोटरी क्‍लबचे अध्यक्ष विनय गावकर यांनी सांगितले. कार्यक्रमास सुहास ओरसकर, चाचा हडकर, केंद्रप्रमुख मोनिका कार्डोज, अनिल चव्हाण, राजेश पारधी, प्रशांत गावकर, संतोष गोवेकर, मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. 

टॅग्स