सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ होडी उलटली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मालवण - किल्ले सिंधुदुर्गनजीकच्या सात वाव खोल समुद्रात एक मासेमारी नौका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शुक्रवारी सकाळी उलटली. यातील पाच मच्छीमार समुद्रात फेकले गेले. त्यांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले. त्यांच्यासह नौका किनाऱ्यावर आणण्यात आली. मासेमारी हंगामाच्या सुरवातीस गेल्या काही दिवसांतील होडी उलटण्याची ही तिसरी घटना आहे.

दांडी येथील अनिता वाघ यांच्या मालकीची दिर्बादेवी ही छोटी नौका घेऊन पाच मच्छीमार आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. किल्ले सिंधुदुर्गच्या मागे सात वाव खोल समुद्रात नौका गेली असता, जोरदार वारा व लाटांमुळे ती उलटली. यामुळे पाचही मच्छीमार पाण्यात फेकले गेले. जीव वाचविण्यासाठी त्यांनी नौकेचा आधार घेतला. यातील वासुदेव खोबरेकर यांनी मोबाईलवरून किनाऱ्यावरील मच्छीमारांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी बुडालेली नौका दोरखंडाला बांधून चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर किनाऱ्यावर आणली.