शिल्पा खोत ‘मालवण सौभाग्यवती’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मालवण - जागतिक महिला दिनानिमित्त येथील स्नेहल भगिनी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत शिल्पा यतीन खोत यांनी ‘मालवण सौभाग्यवती’चा बहुमान पटकावला.

येथील मामा वरेरकर नाट्यगृहात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत द्वितीय श्‍वेता यादव, तृतीय प्राची प्रभू, उत्तेजनार्थ स्मिता सारंग, राणी पराडकर, बेस्ट स्माईल स्मिता सारंग, बेस्ट कॅटवॉक राखी मालवणकर, बेस्ट पर्सनॅलिटी केतकी सावजी यांनी क्रमांक पटकावले. विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २५००, २०००, तसेच ५०० रुपये देऊन गौरविण्यात आले.

या वेळी स्नेहल भगिनी मंडळाच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, सचिव संध्या अवसरे, खजिनदार नमिता धामापूरकर, वंदना कांदळकर, संध्या परुळेकर, स्वप्नाली नेरुरकर, लतिका नेरुरकर, नगरसेविका ममता वराडकर, वेलंदी नेरुरकर, शैला मयेकर, रिमा चव्हाण, ज्योती राळनकर उपस्थित होत्या. स्पर्धेत एकूण पंधरा जणांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून तन्वी चांदोस्कर (देवगड), सिद्धी आचरेकर (तळेबाजार) यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी चेतन हडकर, विधिता देऊलकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अनुष्का चव्हाण व रिया बांदेकर यांनी केले.

Web Title: malvan saubhagyavati shilpa khot