मंडणगडच्या जंगल भागात ‘नवरंग’ची घरटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मंडणगड - एप्रिल ते जुलै या कालावधीत अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. कारण त्या वेळी निसर्गात नवजात पिलांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध असते. सध्या तालुक्‍यात जंगलात नवरंग पक्षाची अनेक घरटी दिसून येत आहेत. 

मंडणगड - एप्रिल ते जुलै या कालावधीत अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. कारण त्या वेळी निसर्गात नवजात पिलांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध असते. सध्या तालुक्‍यात जंगलात नवरंग पक्षाची अनेक घरटी दिसून येत आहेत. 

साळुंकीपेक्षा थोडा लहान बिनशेपटीचा, पण अतिशय सुरेख असा हा नवरंग पक्षी. शास्त्रीय भाषेत याला ‘पिट्टा ब्रॅक्‍यूरा’ असे म्हणतात. ब्रॅक्‍यूरा हा ग्रीक शब्द ब्रॅक्‍यूस म्हणजे आखूड आणि ओरस म्हणजे शेपटी या दोन शब्दांच्या मिश्रणातून आला आहे. तालुक्‍यात त्याला मोर चिकल्या, बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, गोळफा, खाटिक, नवरंग, पाउसपेव या नावाने सुद्धा ओळखले जाते. हिरवी पाठ, पिवळसर केशरी पोट, बुडाला लाल जर्द पट्टा, डोळ्यावर काळी पट्टी, पंखात निळसर लकेर, मोरपंखी छटा आणि अगदीच आखूड नसल्यासारखी शेपटी. साजेसे नऊ रंग या पक्ष्याला अधिकच सुंदर बनवितात. नवरंगाच्या पाच जातींपैकी हा एक आहे. किडे, फुलपाखरे, सुरवंट ही त्याची खाद्य आहेत. स्थानिक रहिवासी असून तो स्थलांतरही करतो. नवरंगाच्या विणीचा काळ मे ते ऑगस्ट असून गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा आवाज सकाळ, संध्याकाळ व्हीट-टयू असा असतो. ग्रामीण भागात याची शिकार केली जात असल्याने हा पक्षी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे.

कोकण

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने...

03.12 AM

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...

03.12 AM

सावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार...

02.12 AM