मुंबई-गोवा महामार्गावर 1 ठार; 38 जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

माणगाव - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एसटीच्या बस एकमेकांवर धडकून झालेल्या दोन अपघातांत 28 जण जखमी झाले. याशिवाय शनिवारी सायंकाळी मालमोटारीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी सायंकाळी गोव्याहून अहमदाबादकडे निघालेल्या मालमोटारीच्या धडकेत संजय शांताराम कदम (50, भादाव, ता. माणगाव) या दुकाचीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मालमोटारचालक मोहम्मद मासूक मोहम्मद फारुख (रा. राणीगंज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरा अपघात आज पहाटे ढालघर फाटा येथे झाला. हिंदळे येथून मुंबईकडे जाणारी प्रवासी बस महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे चालकाने बाजूला उभी केली होती. या बसला मुंबईकडे जाणाऱ्या एसटीने पाठीमागून धडक दिली. यात एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले. तिसरा अपघात आज पहाटे महामार्गावर माणगावनजीक कशेणे गावाच्या हद्दीत घडला. एसटीच्या दोन बस एकमेकांवर धडकून तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.