अनेक डॉक्‍टरांचा जिल्हा रुग्णालयाला रामराम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

रुग्ण जातात खासगी रुग्णालयात
डायलेसीस विभागात दररोज सुमारे 20 ते 25 रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागते. अनेकांना तेथील शुल्क न परवडणारे असल्याने उपचारापासून ते वंचित राहण्याची शक्‍यता आहे. सध्या कार्यरत असलेल्या चौदा वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन वैद्यकीय अधिकारी गेल्याने जिल्हा रुग्णालय आता बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जाते.

रत्नागिरी - एम.डी. मेडिसीन, डायलेसीस, अतिदक्षता आदी विभाग सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आधीच अत्यवस्थ असलेले जिल्हा रुग्णालय आता गॅसवर गेले आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांच्याकडे अतिदक्षता विभागाचा भार सोपविण्यात आला आहे. डायलेसीस विभाग केवळ तंत्रज्ञांच्या मदतीने सुरू आहे.

जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती म्हणजे "आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास' अशी झाली आहे. रुग्णांना 24 तास सेवा देण्याचा प्रयत्न करणारे अधिकारीच गेल्याने रुग्णसेवेचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे; परंतु सत्ताधारी लोकप्रतिनिधींना त्याचे काही सोयरसुतक नाही. जिल्हा रुग्णालयात प्रथम श्रेणीची 19 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ 4 पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक, दोन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रुग्णसेवेसाठी कायम कार्यरत असलेल्या वर्ग दोनमधील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची 30 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 29 पदे कागदोपत्री भरलेली आहेत. आठ वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी दीर्घकालीन रजेवर आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित आहेत. एका वैद्यकीय अधिकाऱ्याला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्‍ती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत चार वैद्यकीय अधिकारी रुग्णालय सोडून गेल्याने येथील वैद्यकीय सेवा गॅसवर गेली आहे.

एमडी मेडिसीन असलेले डॉ. किरण खलाटे संपूर्ण जिल्हा रुग्णालयाचा कार्यभार हाताळत होते. त्यांची बदली झाल्यानंतर डॉ. सुलक्षणा यांनी डायलेसीससह अतिदक्षता विभाग यशस्वीपणे सांभाळला; मात्र त्यांची बदलीही ठाणे येथे झाल्यामुळे या दोन्ही विभागांना वालीच उरलेला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोकण

रत्नागिरी - जिल्ह्यातील कातळशिल्पांचे नोटीफिकेशन करुन ती संरक्षित करण्यासाठी राज्य व केंद्राच्या पुरातत्त्व अधिकाऱ्यांशी चर्चा...

03.36 PM

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या...

03.36 PM

राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळल्याचे सांगितले...

02.33 PM