दुचाकी व स्‍कूलव्हॅन अपघात दोन ठार, एक जखमी

Accident
Accident

रायगड : मुंबई गोवा राष्‍ट्रीय महामार्गावर महाड नजिक केंबुर्ली गावाजवळ दुचाकी व
स्‍कूलव्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच 
मृत्यु झाला. तर स्‍कूलव्हॅन चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने स्‍कूल
व्हॅन मध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी अकरा वाजता हा 
अपघात घडला. अपघातातील दुचाकीस्वार महाडकडे येत होते, तर अँजल किड्स स्कूलचे नाव लिहिलेली ही छोटी स्कूलव्हॅन महाडहून वहूरकडे चालली होती. 

केंबुर्ली गावाजवळ एका वळणावर स्कूलव्हॅनला दुचाकीची चालकाच्या बाजूला जोरदार
धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दुचाकीवरील मंगेश 
बोराडे (रा.तळोशी-महाड) व विशाल शिंदे (रा. वावे पोलादपूर) हे दोघे जागीच 
ठार झाले. तर स्‍कूलव्हॅन रस्त्याच्या कडेला गेली व चालक इंद्रजीत ठोंबरे 
(रा. महाड) गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्‍णालयात
हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त केटिएम मोटारसायकल केवळ पंधरा दिवसांपूर्वी
घेतली होती. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com