संगमेश्वरमध्ये नाभिक संघटनेतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध

Barber's association
Barber's association

संगमेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या आरंभप्रसंगी भाषणात नाभिक समाजाबाबत विद्रोही भाषा वापरली याबाबत संगमेश्वर तालुका नाभिक संघाने व चालक मालक संघटनांनी आपली दुकाने बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवला. 

देवरुख येथे नायब तहसीलदार भाऊ गीते यांच्याकडे निषेधाचे निवेदन देण्यात आले. देवरुख येथे अध्यक्ष परशुराम चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद आंब्रे, अभिजित चव्हाण, सचिव दिनेश आंब्रे, खजिनदार धोंडू आंब्रे यांच्यासह तालुका कार्यकारिणी सदस्यांनी हे निवेदन दिले. पत्रकार परीषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करून समस्त नाभिक समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजाचे उदाहरण देऊन विरोधकांना बोलणे म्हणजे चांगले राजकारण नाही. नाभिक समाज हा एकसंघ आहे, तो असले प्रकार कधीच खपवून घेणार नाही, असे सांगत आम्ही आमची सलून एक दिवस बंद ठेवून, जाहीर फलक लावून मुख्यमंञी यांचा जाहीर निषेध नोंदवत आहोत असे स्पष्ट केले. 

देवरूख शहरात नाभिक संघटनेने निषेधाचे भले मोठे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला. आमचा निषेध शासनापर्यंत पोहचवा असे परशुराम चव्हाण यांनी नायब तहसीलदार भाऊ गीते यांना निवेदन देताना सांगितले. देवरूख येथे संगमेश्वर तालुका नाभिक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्रोही विधान करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा निषेध करत जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांना निवेदन देताना केली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com