स्काउट गाईड शिबीरात विदयार्थ्यांनी घेतले अंधश्रद्धा निर्मुलनाचे धडे

Andhasraddha-nirmulan
Andhasraddha-nirmulan

पाली : आत्मोन्नती विद्यामंदीर, जांभूळपाडा येथील स्काउट गाईडच्या विदयार्थ्यांचे शिबीर सुधागड तालुक्यातील गोंदाव गावी पार पडले. यावेळी अंनिस पाली शाखेतर्फे चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले गेले. चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. 

आत्मोन्नती विद्यामंदिरचे शिक्षक शरद निकुंभ यांच्या सहकार्याने अंनिसला स्काउट गाईडच्या शिबीरामध्ये चमत्कार सादरीकरण कार्यक्रम घेता आला. यावेळी अंनिस पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी पाण्यावर दिवा पेटवणे, जिभेतून तार आरपार बाहेर काढणे, हवेतून सोन्याची चेन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागाने करुन दाखविले. त्याद्वारे चमत्कारामागे विज्ञान आणि हातचलाखी कशी असते याची उकल करून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती कशी जोपासायला हवी याबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. यावेळी विदयार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमास कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांना अंनिस कार्यकर्ते केतन निंबाळकर यांनी मोलाची साथ दिली. स्काउट गाइडचे टि. डी. कदम व सहकारी दत्तात्रेय सावंत यांनी सहकार्य व योगदान दिले. '

अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विदयार्थ्यांसमोर वैज्ञानिक जाणीव जागृती सहजपणे निर्माण करता येते. विदयार्थ्यांमध्ये चिकित्सक व शोधक वृत्ती तयार होणे गरजेचे आहे. तरच अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन करता येईल. अशा प्रकारे अधिकाधिक शाळांनी आम्हाला प्रबोधन करण्याची संधी द्यावी. जेणेकरुन अजूनही खूप चांगले कार्यक्रम करून समाज प्रबोधन करता येईल.' असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पाली -सुधागड शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com