एसटीच्या दुरावस्थेमुळे परिवहन मंत्र्यांना चालक-वाहकांचे निवेदन

रवींद्र साळवी
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

लांजा (रत्नागिरी) : खराब रस्त्यामधुन बस चालविताना करावी लागणारी कसरत त्यातून होणारे अपघात आणि शरिरावर निर्माण होणार ताण यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्यात दिला जाणारा तुटपुंजा पगार आणी वस्तीच्या ठिकाणच्या असुविधा या समस्यांबाबत लांजा एसटी आगारातील काही चालक-वाहकांनी परिवहन मंत्र्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करुन या समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे.

लांजा (रत्नागिरी) : खराब रस्त्यामधुन बस चालविताना करावी लागणारी कसरत त्यातून होणारे अपघात आणि शरिरावर निर्माण होणार ताण यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्यात दिला जाणारा तुटपुंजा पगार आणी वस्तीच्या ठिकाणच्या असुविधा या समस्यांबाबत लांजा एसटी आगारातील काही चालक-वाहकांनी परिवहन मंत्र्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करुन या समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यानंतर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. महत्त्वाच्या राज्य महामार्गांची डागडुजी केली जाते. परंतु गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. अरुंद असणाऱ्या या रस्त्याची काही ठिकाणी अक्षरशः चाळण झालेली असते. दुतर्फा असणाऱ्या साईड पट्टीवर देखील झाडे, झुडपे वाढलेली असतात. त्यांची वेळीच छाटणी केली जात नसल्याने एसटी बस व इतर वाहनांचा समोरासमोर अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण होते. खराब रस्त्यामुळे एसटी बस ही खिळखिळ्या झाल्या आहेत. बसच्या  होणाऱ्या या दुरावस्थेकडे ही लक्ष दिले जात नाही. केवळ पासिंग पुरत्या सुधारणा केल्या जातात. 

काही बसची फारच बिकट अवस्था आहे. क्लच, एक्सेलेटर बांधुन ठेवलेले पहावयास मिळतात. नव्या गाड्यांमध्ये हवेसाठी पंख्याची सोय आहे. मात्र तो पंखा छोटा असल्याने त्याची हवा लागत नाही. इंजिन ही अगदी जवळ असल्याने भट्टीत बसल्यासारखे चालकाला वाटत असते. रस्ते व एसटी बसची दुरावस्थेमुळे सुधारणा करण्याची गरज आहे. 

सगळ्या राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांपेक्षा एसटी मधील कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार दिला जात आहे. रात्र वस्तीसाठी अवघा 7 रुपये भत्ता दिला जातो. हा भत्ता अगदी तुटपुंजा आहे. वस्तीला गेलेल्या चालक व वाहकाला रात्रभर काही ठिकाणी बसमध्ये झोपावे लागते. तेथे शौचालयाची सोय नसते. त्यामुळे त्यांना उघड्यावर शौचाला जावे लागते. 

पगारवाढ व वस्तीच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. खराब रस्त्यांमधुन बस चालविताना काही वेळा अपघात होतात. तर खड्यांमधुन वाट काढताना शरिरावर ताण येऊन अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बसचा पाटा तुटणे, टायर पंक्चर होणे, बस ब्रेक डाऊन होण्यासारख्या समस्या नियमित घडत असतात. यातुन प्रवासी आणी चालक व वाहकांमध्ये वाद निर्माण होतात. चालक, वाहकांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. यामुळे आरोग्य विषयक समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

एकुणच सामन्य कर्मचारी म्हणून बस व आम्हा कर्मचाऱ्याची बिकट अवस्था पाहुन वाईट वाटते यामुळे एस. टी मधील सुचित केलेल्या सुचनांची दखल घेऊन सुधारणा करण्याची मागणी लांजा एस. टी आगारातील  विशाल लांबोरे, विजय कोत्रे, ज्ञानेश मिरजकर, अरुण चव्हाण, जे. डी माजळकर,पी.स.धुळप, एस. पी. मेस्त्री, जे. एम. पवार, ऐ. बी. माने आणी एस. एस. नाखवा या कर्मचाऱ्यांच्या वतीने परिवहन मंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

Web Title: Marathi news kokan news bad condition st