आदिवासी विद्यार्थ्यांसोबत तरुणाने केला वाढदिवस  साजरा

pali
pali

पाली (रायगड) : आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण, गरजूंना शिक्षण देऊन करा साजर, असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य धीरज विजय लोके (रा. डोंबिवली) यांनी आपल्या जन्मदिनी केले आहे. त्यांनी आपला वाढदिवस सुधागड तालुक्यातील परळी येथील राजिप आदिवासीवाडी शाळा नेरे आणि राजिप विकासवाडी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून व त्यांच्या सोबत केक कापून साजरा केला.

धीरज लोके यांनी सकाळला सांगितले की, वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला एक असा दिवस जो शक्यतो आनंदातच साजरा होतो. कुणी म्हणत आयुष्यातील एक वर्ष कमी होते. मग तो दिवस का साजरा करायचा? पण काही जण म्हणतात आयुष्याचा अनुभव एक वर्षाने वाढला, म्हणुन हा दिवस जल्लोषात साजरा करायचा. पण मी विचार केला, एक आनंदाचा दिवस मिळालाय तो कुणालातरी आनंद देण्यासाठी साजरा करायचा. मग सुधागड तालुक्यातील परळी येथील दोन आदिवासी वाड्यांवरील शाळेतल्या ज्या मुलांचा नुकताच वाढदिवस झालाय किंवा वाढदिवस असणाऱ्या मुलांकडुन केक कापुन घेतला. ज्या मुलांना स्वत:ची जन्म तारीखही निटशी माहीत नव्हती त्यांना केक कापुन झालेला आनंद पाहण्यासारखा होता. शाळेच्या सर्व मुलांना वही, पेन, पेन्सिल आदि शैक्षणिक साहित्य भेट दिलं. यावेळी शाळेचे शिक्षक प्रवीण माडेवार व शेख सर आणि दुर्गवीरचे सभासद प्रज्वल पाटिल आणि सचिन रेडेकर उपस्थित होते.

तुम्हीही आशा प्रकारे साजरा करा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण...
खर तर ही भेट पुरेशी नाही. तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करावासा वाटला तर या अशा शाळांमध्ये शैक्षणिक मदत करुन साजरा करू शकता. शैक्षणिक मदत म्हणजे फक्त वही, पुस्तक, पेन, पेन्सिल वाटप नाही तर इतरही वस्तु ज्याने त्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. कुणी शिक्षण क्षेत्रात असेल विविध उपक्रम, स्पर्धा या शाळांमध्ये आयोजित करुन मुलांना त्यांचे कलागुण पारखण्याची संधी निर्माण करुन देऊ शकतो. एखाद्या शाळेत संगणक, प्रोजेक्टर, स्पिकर सारख्या वस्तु उपलब्ध करुन काळासोबत चालायची संधी या मुलांना निर्माण करुन द्यावी. कुणी अभिनय, डान्स, चित्रकला, हस्तकला आदी कलांमध्ये या नैपुण्य मिळवु देऊ शकेल. असे आवाहन धीरज लोके यांनी सकाळच्या माध्यमातून केले आहे.

माझ्या मित्र यादीत हजारो जणांचा समावेश आहे. यातील प्रत्येकाने किमान एक दिवस या मुलांसाठी दिला तर त्या मुलांचे संपूर्ण वर्ष एक नावीन्याने भरलेलं असेल. त्यामुळे प्रत्येकाने या मुलांसाठी तुमचा एक आनंदाचा दिवस नक्की द्या! चला तर #Celebration_For_Education #आनंदाचाक्षणदेवु_शिक्षण ह्या हॅश टॅग ने हा उपक्रम तुमच्या मित्रपरिवारात पोहोचवा. आणि तुम्ही सुद्धा एक दिवस यासाठी द्या! बघा तुमचा एक आनंदाचा क्षण शिक्षण देऊन साजरा करताना कसं वाटतय? या उपक्रमात सहभागी व्हायचंय तर मला नक्की मेसेज/फोन करा:-  9969359486, असे धीरज लोके यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com