आंबा नदीवरील पुलाचे कठडे तोडून मोटार नदीत कोसळली, महिलेचा मृत्यू

अमित गवळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

वाकण पाली मार्गावर आंबा नदी पुलावरुन संरक्षण कठडे तोडून मोटार (महिंद्रा झायलो) नदी पात्रात कोसळली. हा अपघात सोमवारी (ता. 5) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. 

पाली (रायगड) : वाकण पाली मार्गावर आंबा नदी पुलावरुन संरक्षण कठडे तोडून मोटार (महिंद्रा झायलो) नदी पात्रात कोसळली. हा अपघात सोमवारी (ता. 5) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. 

Bridge

ही मोटार मुंबईवरुन खोपोली मार्गावरुन पालीमार्गे खेडकडे जात होती. मोटारीत वाहनचालक विजय पाटणे (वय 30) यांच्यासह कमलेश पाटणे व आशा पाटणे हे प्रवास करीत होते. सोमवारी (ता. 5) मध्यरात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास आंबा नदीपुलाजवळ वाहनचालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे आंबा नदी पुलाचे संरक्षण कठडे तोडून मोटार थेट आंबा नदीच्या पाणी भरलेल्या पात्रात कोसळली. यामध्ये आशा पाटणे (वय 53) यांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीसांसह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. पाली आंबा नदी पात्र पाण्याने पूर्णपणे भरलेले आहे. तसेच रात्र असल्याने मदतकार्यास अडथळा निर्माण झाला होता. झायलो मोटार हायड्राच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढली. यावेळी पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एल. व्ही. म्हात्रे, पोलिस हवालदार आत्माराम पाटील, पोलिस नाईक मनोज हंबीर, पोलिस शिपाई शंकर साळवी, दर्शन कोकाटे यांच्यासह पालीतील पन्नासहून अधिक तरुणांनी, नागरीकांनी मदतकार्य केले. याबाबत पाली पोलीस स्थानकांत वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार पि. डी. म्हात्रे करीत आहेत.

 

Web Title: Marathi news kokan news bridge accident car fallen from bridge one dies