चित्रांच्या दुनियेत मुक्तपणे अभिव्यक्त झाले सारे

drawing
drawing

पाली - चित्रकले विषयी नवीन दृष्टी देणारे 'रंगोत्सव2018' हे 3 दिवसीय शिबीर नुकतेच माणगाव येथील वडघर गावाजवळ असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात संपन्न झाले. आंतरभारती कलाभवनचा हा येथे पाहिला उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रभाकर कोलते यांनी वेगवेगळे प्रयोग करत चित्रकलेविषयीची भीती घालवून जगणं समृद्ध करणाऱ्या या कलेविषयी सगळ्यांची उत्सुकता वाढवली.

चित्रकला शिकवण्याच्या पारंपरिक ठाशीव पद्धतींमध्ये मुलांना साचेबद्ध विचार करण्यात अडकवले जाते. त्यामुळे मुक्तपणे अभिव्यक्त होण्याऐवजी मुलांमध्ये चित्रकलेविषयी भीतीच निर्माण होते. म्हणून मुलांच्या समोर भरपूर रंग ठेवत तुम्हाला हवे तेव्हढे रंग घेऊन हवे ते चित्र काढा असे सांगितल्यानंतर सर्व शिबिरार्थींनी उत्स्फूर्तपणे चित्रे काढली. डोळे बंद करून पेंटिंग करण्यापासून ते एक संपूर्ण भिंतच रंगावण्यापर्यंत अनेक धम्माल अनुभव शिबिरार्थींन मिळाले. ४ ते ४० वर्षे असे वेगवेगळया वयोगटातील निवडक शिबिरार्थींसह चिपळूण येथील प्रयोगभूमी या शाळेतील आदिवासी व धनगर विद्यार्थ्यांचाही या शिबिरात सहभाग होता.

प्रभाकर कोलते यांनी स्वतः दिलेले दोन डेमो हा या शिबिरातील अविस्मरणीय अनुभव होता. एक पोर्ट्रेट व एक त्यांच्या स्वतःच्या शैलीतील खास पेंटिंग असे दोन डेमो त्यांनी शिबिरार्थींसाठी दिले. कोलते यांच्या बरोबरच सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद हाटे यांचेही मार्गदर्शन शिबिरार्थींना मिळालं.

या शिबीराच्या समारोप प्रसंगी आंतरभारती कलाभवनचे अध्यक्ष युवराज मोहिते, सदस्य गणेश विसपुते, राजेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, स्मारकाचे विश्वस्थ राजन इंदुलकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शिबीरार्थीना प्रमाणपत्र वाटण्यात आले. यावेळी सतीश शिर्के देखिल उपस्थित होते. 'कोलते सरांसारख्या कार्व्हरसह चित्रकलेच्या दुनियेतील एका मोठ्या प्रवासाला तुमची आज सुरुवात झाली' अशा शब्दात रंगोत्सव शिबिराच्या समारो पप्रसंगी बोलताना गाजनान खातू यांनी मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com