धुरक्यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम

fog
fog

पाली : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून सर्वत्र सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची दुलई पसरत आहे. याचा परिणाम येथून जाणार्या राष्ट्रिय व राज्य महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. येथे अपघातांचा धोका वाढला असुन वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. परंतू या अल्हाददायक वातावरणाचा प्रवाशी व पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहेत.

जिल्ह्यातून मुंबई-गोवा तसेच मुंबई-बैंगलोर हे दोन महत्वाचे महामार्ग जातात. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गसुद्धा जातो.या बरोबरच मुख्य शहरांना व गावांना जोडणारे अनेक राज्य महामार्ग व राज्य मार्ग देखिल आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर पडत असलेल दाट धुके अाणि धुरके यामुळे या मार्गांवर अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी धुक्यामुळे छोटे-मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना रस्ता व समोरील वाहने नीट दिसत नसल्याने वाहन चालवितांना अडचणी येतात. त्यामूळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतुक कोंडी झालेली पहायला मिळते.

धुक्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अधिक धोका
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक चालते. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. त्यातच धुक्यामूळे रस्त्यावरील दुभाजक, खड्डे,फलक, माती-दगड, खडे व रस्त्यावर उभी असलेली वाहणे नीट दिसत नाही परिणामी या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होते व अपघाताचा धोका संभवतो.

प्रवाशी व पर्यटकांना धुक्याचा अानंद
धुक्यामुळे जिल्ह्यातील वातावरण खुप अल्हाददायक झाले आहे. त्यामूळे या धुक्याचा मनमुराद अानंद प्रवाशी, पर्यटक या धुक्याचा मनमुराद अानंद लुटत आहेत. सकाळ धुक्यातुन फिरण्यासाठी निघालेल्यांना देखिल धुकाची दाट दुलई मोहित करत आहे.

महामार्गावर व रस्त्यांवर दाट धुके पसरल्याने वाहनचालविणे धोकादायक झाले आहे. धुक्यामुळे समोर काहीच दिसत नाही त्यामुळे वाहन संथगतीने चालवावे लागते. अचानक समोर काही अाल्यास अपघाताचा धोका संभवतो.
- अनिकेत महाडिक, वाहन चालक, गोरेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com