'अागरायन' चा वेलू गेला गगनावरी...

pali
pali

पाली : बोली भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आगरायन काव्य संमेलन (मैफल) उदयास आले. लुप्त होत चाललेल्या भाषेतील कवितांचे सादरीकरण देखिल अागरायणमध्ये होऊ लागले.अल्पावधीतच अागरायनने २४ व्या प्रयोगांचा यशस्वी टप्पा पार केला.यंदाच्या २७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा दिनी आगरायनचा रौप्यमहोत्सवी २५ वा प्रयोग होत आहे. बुधवारी (ता.२१) जागतीक अांतरराष्ट्रीय मायबोली दिनी अागरायनच्या या प्रवासाचा सकाळने घेतलेले अाढावा.

अागरायनच्या निर्मिती पासूनच सकाळ बातम्यांच्या माध्यमातून नेहमीच अागरायनच्या टिम सोबत अाहे. आज मराठी साहित्यात प्रमाण भाषेच्या तुलनेत फार कमी प्रमाणात बोली भाषेतील साहित्य हे जगासमोर आलं आहे. बोली भाषा ही मराठी भाषेला खरं तर पावलो न पावली समृध्दच करत जाते, परंतु प्रस्थापितांच्या साहित्यात तिला नेहमी दुय्यम स्थान मिळते. ह्याच पार्श्वभुमीवर कवी गजानन पाटील, प्रकाश पाटील आणि सर्वेश तरे यांनी आगरी-मराठी कवितांची आगरायन ही बोली भाषेतील मैफल एक वर्षापुर्वी ३१ नोव्हेंबर २०१७ ला सुरु केली. मैफलीचा पहिला प्रयोग ठाण्यातील बी. एन. बांदोडकर महाविद्यालयात झाला आणि विद्यार्थी रसिकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. 

या मैफलीत गजानन पाटील, प्रकाश पाटील, डाॅ.अनिल रत्नाकर, सर्वेश तरे, ज्ञानेश्वर चिकणे, डाॅ.प्रगती पाटील, रिध्देश तरे यांचा समावेश होता. त्यानंतर आगरायनचे प्रयोग महाविद्यालयाच्या फेस्टिवल मध्ये गाजु लागले आणि बाहेरही म्हणजेचं खुल्या रंगमंचावरही होऊ लागले. प्रकाश पाटलांची ‘मी ज बोल्लु त माझा तोंड दिसतं’ गजानन पाटलांची ‘माझा डावा डोळा लवला’ सर्वेश तरे यांची ‘पाकिस्तान कवरा ठान्या आवरा’ तसेत अनिल रत्नाकर यांची ‘ब’ ही आगरी कविता विद्यार्थी आणि रसिकांच्या मनात घर करु लागली. प्रसिध्द गझलकार डाॅ. कैलास गायकवाड यांनीही मैफलीत आगरी गझला सादरीकरण करुन वाह वाह मिळवली. मैफलीला महाराष्ट्रातील प्रसिध्द लोककवी अरुण म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहभाग लाभला.मैफल आगरी महोत्सवातही भरु लागली.

आगरायनचे आता पर्यंत २४ प्रयोग झाले असुन यात ५० हुन अधिक कवींनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये बोलीभाषेचा गोडवा आगरायन मुळे वाढला असं मैफल आयोजीत करणार्या विविध महाविद्यालयांच्या वाड:मय मंडळाचे म्हणने आहे. कदाचित याचीच फळश्रृती म्हणजे मुंबई विद्यापिठाने याच वर्षीपासुन कला शाखेच्या द्वितीय वर्षाला आगरी,मालवणी आणि वाडवळ या बोलींचा अभ्यासक्रमात विषय म्हणुन समावेश केला. यंदाच्या २७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा दिनी आगरायनचा रौप्यमहोत्सवी २५ वा प्रयोग होत आहे. प्रमाण भाषे प्रमाणेच बोलीभाषाही आता मुख्यप्रवाहात येत आहे. या सगळ्याचा खुप अानंद होत आहे परंतू आमचा बोलीभाषा जतनाचा प्रयत्न असाच सुरु ठेवु असं आगरायनचे कवी सर्वेश तरे यांनी सकाळच्या माध्यमातून ग्वाही दिली.

९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘बोलीभाषा कट्टा’
अागरायनचा वाढता प्रतिसाद आणि प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल पाहुन आगरायनचे कवी डाॅ.अनिल रत्नाकर,गजानन पाटील आणि सर्वेश तरे यांना आगरी युथ फोरमने ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावर निवड केली. परंतु तेथेही प्रमाण भाषेतील कवितांचे स्थान आणि बोलीभाषेते स्थान पाहुन आणि बोली भाषे विषयीची तळमळ ह्या कवींना स्वस्त बसु देत नव्हती. मग साहित्य संमेलनाच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण झाला ‘बोलीभाषा कट्टा’ आणि ह्या ऐतिहासिक कट्ट्यात महाराष्ट्राचुन ९० हुन अधिक कवी आणि १९ बोली भाषांचा समावेश झाला.

दुर्मिळ बोली भाषांचे पुनर्ररुज्जीवन व हक्काचे व्यासपीठ
महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात अश्या १२ हुन अधिक बोलीभाषाचा यात समावेश झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या अनुभवा नंतर आगरायनच्या कवींना कळुन चुकले की आगरीचं नाही महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा या अश्याच उपेक्षीत राहिल्या आहेत. मग आगरायन मैफल ही आगरी कवितांची मैफल न रहाता महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात बोलीभाषा जतन करणारी मैफल झाली. मग ह्या मैफलीत आगरी कवींबरोबर मालवणीत सुमेध जाधव, मराठवाडीत दीप पारधे, वर्हाडीत प्रकाश वानखेडे, कादोडी कवी सॅबी परेरा. इतकेचं नाही तर भोजपुरी-संस्कृतही कविता सादर झाल्या. अशा प्रकारे अागरायनच्या व्यासपीठावर दुर्मिळ बोली भाषांचे पुनर्ररुज्जीवन होऊन त्यांना नवी उभारी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com