'शिवसेनाप्रमुखांची जयंती तिथीनुसार करणार का?'

Nitesh Rane
Nitesh Rane

कणकवली : "छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी ही राज्य सरकारने निश्‍चित केली आहे. त्यासाठी इतिहास संशोधकांची समितीही नेमण्यात आली होती; परंतु शिवसेनेची काही मंडळी शिवजयंतीच्या मुद्यावर पुन्हा घोळ घालत आहेत. विधिमंडळात तिथीनुसार शिवजयंती करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या मंडळींना तिथीचे एवढे वेड असेल तर ते स्वत:चे वाढदिवस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तिथीनुसार साजरी करणार का?'', असा प्रश्‍न आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी उपस्थित केला. 

महाराष्ट्र स्वाभिमान कार्यालयात राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. "प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला समाधानकारक मोबदला मिळत नाही. तोवर आम्ही महामार्ग चौपदरीकरणाचे कामच होऊ देणार नाही. प्रकल्पगस्तांच्या आयुष्याशी कणकवलीतील प्रांत कार्यालयाने खेळ मांडला आहे. टक्‍केवारी देणाऱ्यांना अधिक मोबदला तर इतरांना तुटपुंजा मोबदला देऊन बोळवण केली जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला. 

कारवाईला उत्तर देऊ... 
विधान परिषद निवडणुकीत आपण कुणाला मतदान केले, हे जगजाहीर आहे असे आपण बोललो होतो. त्या मुद्याशी आपण आजही ठाम आहोत. जगजाहीर याचा अर्थ कॉंग्रेसला मतदान केले, असाही होतो. तरीही कॉंग्रेस पक्ष आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून आपल्यावर कारवाई करणार असेल, तर आम्हीही त्याला योग्य उत्तर देऊ, असे राणे म्हणाले. 

त्यानंतरच विमानतळाचे उद्‌घाटन... 
चिपी येथील विमानतळ सुरू होण्याबाबत पालकमंत्री, खासदार प्रत्येक वेळी नवनवीन तारखा जाहीर करत आहेत; पण विमानतळ सुरू करणे हे पालकमंत्री, खासदारांच्या ताकदीच्या बाहेरचे काम आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पालकमंत्री होतील, त्याचवेळी चिपी विमानतळाचे उद्‌घाटन निश्‍चितपणे होईल, असेही राणे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com