सावंतवाडीत झालेल्या करवाढीच्या विरोधात आंदोलन 

agitation
agitation

सावंतवाडी : शासनाकडुन घरपट्टीच्या रक्कमेत करण्यात आलेली पाच पट वाढ ही सर्वसामान्य लोकांसाठी अन्यायग्रस्त आहे. त्यामुळे याबाबत शासनाने पुर्नविचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलना सारखा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा आज येथे नागरीकांच्यावतीने देण्यात आला. 

शासनाच्यावतीने नव्याने नगरपरिषदेकडुन आकारल्या जाणार्‍या घरपट्टी व मालमत्ता करात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. या प्रकीयेचा निषेध करण्यासाठी आज येथिल नागरीकांच्यावतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख शब्बीर मणीयार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर प्रमुख सुधीर आडीवरेकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, सत्यजित धारणकर, बाबल्या दुभाषी, सिध्देश पुरलकर आदी उपस्थित होते. 

यावेळी आंदोलकांकडुन माहिती देण्यात आली. शासनाकडुन चुकीच्या पध्दतीने घरपट्टी तसेच मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. यात लोकांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. तसेच लोकांनी हरकती घेतल्या होत्या, मात्र त्याचा प्राधान्याने विचार करण्यात आलेला नाही. परिणामी आता नव्या अध्यादेशानुसार आकारण्यात आलेली घरपट्टी पाच पट वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे अनेकांनी एवढी रक्कम करापोटी भरणे आम्हाला परवडणारे नाही असे म्हटले आहे. त्यामुळे लोकांचा उद्रेक लक्षात घेता शासनाने ही घरपट्टी कमी करण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा आणि लोकांना न्याय देण्यात यावा अन्यथा या पेक्षा सुध्दा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी श्री भोगटे आणी पनवेलकर यांनी दिला आहे. यावेळी पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनास अमित परब,संजय पेडणेकर,विनोद सावंत,गजा कुडपकर,राजू पनवेलकर,संतोष मठकर,शेखर धारगळकर,परशुराम पावसकर,रावजी परब,प्रसाद अरंविदेकर,साई कोरगावकर,सुधीर सावंत,राकेश बांदेकर,उल्हास कोरगावकर,कीरण राउळ,विजय मेजारी,सूधीर धूमे.रमेश मडव,राजाराम गावडे,आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com