विज्ञान प्रदर्शनात अंधश्रद्धांचे उच्चाटन

pali
pali

पाली : सुधागड तालुका विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती - पाली शाखेने विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती निर्माण केली. एकलव्य अनुदानित आश्रमशाळा, वावळोली येथे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन भरविण्यात आले होते. अंनिस कार्यकर्त्यांनी तालुक्यातील आणि शाळेतील चारशेहुन हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांसमोर कोणत्याही घटनेचा कार्यकारणभाव वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने प्रत्येकाला कसा समजतो, हे प्रात्यक्षिकासह उलगडून दाखवले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी सप्रयोग व्याख्यान देण्यात आले. आश्रमशाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जयवंत गुरव यांनी अंनिस पाली शाखेला विज्ञान प्रदर्शनात कार्यक्रम करण्याची संधी दिली. यावेळी अंनिस कार्यकर्त्यांनी निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रात्यक्षिक व प्रचिती याद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध होतो हे सांगितले. अनेक भोंदूबुवा - बाबा त्याअभावी समाजामध्ये आपले प्रस्थ कसे वाढवतात आणि लोकांचे कसे शोषण करतात हेही पाण्यावर दिवा पेटवणे, हवेतून सोन्याची चैन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे यांसारख्या प्रयोगातून विद्यार्थी सहभाग घेऊन स्पष्ट केले. त्याचबरोबर आपल्याला भास कसे होतात त्यातून भूताची कल्पना कशी तयार झाली हेही प्रयोगाद्वारे स्पष्ट केले.

हे सर्व प्रयोग व विश्लेषण महाराष्ट्र अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर व पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी केले. यावेळी विद्यार्थांनी यापुढे सर्व घटनांवर स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासूनच त्यामागील कार्यकारणभाव स्वीकारणार असे सांगितले.तसेच उपस्थित शिक्षकांनीही प्रत्येक तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये या प्रकारचे कार्यक्रम व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली. सुधागड तालुका विज्ञान प्रदर्शनात लागोपाठ दुसऱ्यावर्षी हा उपक्रम घेण्याची संधी मिळाल्याबद्दल मोहन भोईर यांनी शिक्षण विभाग व पाली शाखेचे कौतुक करुन अायोजकांचे अाभार मानले. या कार्यक्रमासप्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जयवंत गुरव,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. अार. कुंभार,शिक्षिका गुलाब गुरव, दंत मॅडम, शिक्षक अनिल मढवी,शिरिष मलुष्टे व विजय काटकर यांच्यासह विदयार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com