सुधागडमध्ये 200 आदिवासींच्या पोटात अाणि अंगावर मायेची ऊब

sudhagad
sudhagad

पाली : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर भागातील दोनशे आदिवासी बांधवांसह गरीब गरजूंना ब्लँकेट व धान्याचे वाटप करण्यात आले. रविंद्र पटणी फॅमिली चॅरीटेबल ट्रस्ट व बौध्द विकास मंडळ पाच्छापूर पंचशिलनगर यांच्या वतीने हा समाजोपयोगी उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

सामाजिक बांधिलकी व सेवाभावी दृष्टीकोणातून रविंद्र पटणी फॅमीली चॅरीटेबल ट्रस्ट व बौध्द विकास मंडळ पाच्छापूर पंचशिलनगर हे नेहमीच येथील आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी योगदान देत आहेत. सध्या थंडीचे दिवस असून डोंगराळ व जंगल भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांचा व गरिब गरजवंतांचा थंडीपासून बचाव व्हावा याकरीता तसेच त्यांना अन्नातून पुरेशी उर्जा मिळण्यासाठी ब्लॅन्केटचे व धान्याचे वाटप करण्यात आले अाहे. असे रविंद्र पटणी फॅमीली चॅरीटेबल ट्रस्ट डॉ. शेखावत यांनी सकाळला सांगितले. यावेळी अादिवासी व गरिब बांधवांनी रविंद्र पटणी फॅमीली चॅरीटेबल ट्रस्ट व बौध्द विकास मंडळ पाच्छापूर पंचशिलनगरच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले. यावेळी डी.के.जैन, डॉ.शेखावत, बौध्द विकास मंडळ पाच्छापूर माजी अध्यक्ष राजेंद्र (भाऊ) महाडीक, चंद्रकांत घोसाळकर, भिम महाडीक, सिध्दांत गायकवाड, रविंद्र महाडीक, संदीप डिकळे आदिंसह मान्यवर, ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थित होते.

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आदिवासी बांधवांचा सर्वांगिण विकास साधला पाहिजे. या दृष्टीने आदिवासी बांधवांना भेडसावणारे विविध गरज, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.आदिवासी बांधवांसोबत जिव्हाळ्याचे नाते व ऋनानुबंध जोपासुन त्यांना यापुढेही सहकार्य करतच राहणार अाहोत.
- राजेंद्र महाडीक, माजी अध्यक्ष, बौध्द विकास मंडळ पाच्छापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com