महामार्गाच्या भूमिपूजनापूर्वीच भाजप, राणे समर्थकांमध्ये रंगले घोषणा युद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नियोजित मुंबई-गोवा महामार्गाचा भूमिपूजन समारंभ सुरू होण्यापुर्वीच भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - नियोजित मुंबई-गोवा महामार्गाचा भूमिपूजन समारंभ सुरू होण्यापुर्वीच भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले.

नियोजित मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमिपूजनाचा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समारंभस्थळी कॉंग्रेस नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचे आगमन झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून राणे समर्थकांनी व्यासपीठाजवळ येत "राणे जिंदाबाद', "आगे बढो' अशा घोषणा सुरू केल्या. यामुळे समारंभस्थळी तणाव निर्माण झाला. यात शिवसैनिकांनीही "शिवसेना आगे बढो' अशा घोषणा सुरू केल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. तर दुसरीकडे व्यासपीठावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर तणाव निवळला. यावेळी पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली.