पक्षीतज्ज्ञांच्या जागरुकतेमुळे गरुडाच्या पिल्लास जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

साडवली (रत्नागिरी) : देवरुख महाविद्यालयाच्या पाठीमागे सिद्धिविनायक मंदिराजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुडाच्या पिल्लास येथील पक्षीतज्ज्ञ आणि जागरुक नागरिकांमुळे जीवदान मिळाले. 

सिद्धिविनायक मंदिरामागे गरुडाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. देवरुखमधील पक्षीतज्ज्ञ सुभाष पाटील यांना यासंदर्भात माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पंखाला जखम झाल्याने ते पिल्लू उडू शकत नव्हते. कावळेही त्याला त्रास देत होते. 

पाटील यांनी त्या पिल्लास पिशवीत घालून कांजिवरा येथील डॉ. हुसेन शेख यांना दाखविले. शेख यांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. गरुडाच्या पिल्लाच्या पंखाला, पायाला मार लागल्याने ते उडू शकत नव्हते. 

दरम्यान, राजू काकडे अकादमीचे जयवंत वाईरकर, गणेश जंगम, प्रमोद हर्डीकर, बंधू बेर्डे, निरंजन बेर्डे यांनी सुभाष पाटील यांची भेट घेऊन त्या पिल्लास अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली. 

डॉ. हुसेन शेख यांच्या उपचाराने ते पिल्लू बरे झाले. 

टॅग्स