जॅक ऍन्ड जिल स्कुलच्या चिमुकल्यांनी आश्रमशाळेत साजरा केला जागतिक बालदिन

जॅक ऍन्ड जिल स्कुलच्या चिमुकल्यांनी आश्रमशाळेत साजरा केला जागतिक बालदिन

पाली : येथील जॅक ऍन्ड जिल स्कुलच्या चिमुकल्यांनी पडसरे आदिवासी आश्रमशाळेत जागतिक बालदिन अनोख्या प्रकारे साजरा केला. केक कापून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. या कार्यक्रमात विद्यार्थी एकोप्याने व आनंदाने सहभागी झाले होते. त्यांच्यातील दरी पूर्णणे दूर झाली होती.

जॅक ऍन्ड जिल स्कुल (इंग्रजी माध्यम) च्या संचालिका प्रभा द्रविड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षकांसह, पालकवर्गातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तीन केक कापून पडसरे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊचे वाटप केले.

जॅक ऍन्ड जिल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जावून कवितांचे देखील सादरीकरण केले.  यावेळी सर्वच विदयार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू  आणि आनंद उमटले होते.  जॅक ऍन्ड जिल स्कुलचे चिमुरडे विद्यार्थी व पडसरे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी एकरुप व तल्लीन झाले होते. त्यांच्यामधील दरी पूर्णपणे नाहीशी झाली होती.  यावेळी जॅक ऍन्ड जिल स्कुलच्या संचालिका प्रभा द्रविड, पडसरे आदिवासी आश्रमशाळेच्या प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मिनाक्षी ढोपे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत, शितल साजेकर आदिंसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.  जॅक ऍन्ड जिल स्कुल पालीतील लहान मुलांना पडसरे आदिवासी आश्रमशाळेत आनून बालदिनानिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आश्रमशाळेच्या वतीने संचालिका प्रभा द्रविड यांचे आभार मानण्यात आले. 

बालवयात व शालेय जीवनापासूनच मुलांवर शिस्त व सुसंस्कार घडले तर त्यांचे भविष्य उज्वल होईल. राष्ट्रहितार्थ त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड निर्माण व्हावी. त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जपणूक करून सेवाभावी गुण विकसित व्हावेत या दृष्टीने शाळेकडून प्रयत्न केले जात आहेत. पडसरे आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आईवडिलांपासून दूर राहून देखील आम्हाला ‘’शिकायचंय, मोठं व्हायचय, या विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत होउन शिकत आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून जॅक ऍन्ड जिलचे लहानगे विद्यार्थी निच्छितपणे प्रेरणा घेतील व आपली प्रगती साधतील. 
- प्रभा द्रविड, संचालिका, जॅक ऍन्ड जिल स्कुल पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com