सुधागडमध्ये विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाश कंदिल

सुधागडमध्ये विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाश कंदिल

पाली : सुधागड तालुक्यातील राजिप शाळा धोंडसेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचे औचित्य साधून अाकर्षक भेटकार्ड, पर्यावरणपूरक अाकाश कंदिल व पणत्या तयार केल्या. विविध संदेश लिहिलेली हि भेट कार्ड तसेच अाकाश कंदिल विदयार्थ्यांनी गावातील लोकांना वाटून फटाके मुक्तीचा संदेश दिला. फटाके न फोडता वाचलेल्या पैशाच्या माध्यमातून वंचित, गरिब व अादिवासी विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे अावाहन केले आहे.

पर्यावरणपूरक अाकाश कंदिल, दिवे व भेट कार्ड देवून लोकांना शुभेच्छांबरोबरच जनजागृती करावी अशी कल्पना शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांना सुचली. त्यांनी लगेच कला ,कार्यानुभव विषया अंतर्गत विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक अाकाश कंदिल, दिवे व भेटकार्ड तयार केले.

या उपक्रमाला शाळेच्या सहशिक्षिका सीमा सिरसट यांचे चांगले सहकार्य लाभले. चिमुरड्यांनी हातात रंग, स्केच पेन, खडु घेवून कार्डबोर्ड, कागद, कात्री, गोंद, माती अादी साहित्याच्या मदतीने अाकर्षक नक्षीकाम केलेले भेटकार्ड, पणत्या व अाकाश कंदिल बनविले. त्यावर विविध संदेश लिहिण्यात आले. पणत्या अाकाश कंदिल व भेट कार्ड तयार करतांना विदयार्थी देहभान हरपून गेले होते. 

विद्यार्थ्यांनी मिळून जवळजवळ चाळीस पेक्षा अधिक आकाश कंदील व भेटकार्ड तयार केले. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान कळावे म्हणून हे आकाश कंदील हे गावात विक्रीसाठी नेल्यास जवळजवळ ७५० रुपयांची विक्री विद्यार्थ्यांनी केली. या पैशांतून गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थी आकाश कंदीलचे महत्त्व पटवून देत असताना सदर आकाश कंदील हा कागदाचा असल्यामुळे प्रदूषण होत नाही याची जाणीव करून दिली. तसेच गावातील आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरामध्ये एक आकाश कंदील भेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आश्वासन प्रत्येक ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांनी घेतले, असे मुख्याध्यापक दिलीप गावीत यांनी सकाळला सांगितले.

शाळेचे उपाध्यक्ष संजय कुंभार यांनी माती उपलब्ध करून दिली. लहानग्यांच्या हातून तयार झालेली हे विवीध अाकर्षक अाकाश कंदिल, दिवे व भेटकार्ड गावातील लोकांना दिवाळी निमित्त वाटण्यात अाले. या माध्यमातून फटाके मुक्त दिवाळीचा संदेश देवून. फटाके न फोडता वाचलेल्या पैशांतून गरिब व वंचित मुलांना शैक्षणिक साहित्ये देण्याचे अावाहन केले आहे.

अाकाश कंदिल, दिवे व भेटकर्ड घरोघरी देवून दिवाळीमध्ये फटाके वाजवू नका हा संदेश दिला. त्याच बरोबर वंचित, गरिब व आदिवासी विद्यार्थ्यांना फटाके न फोडता वाचवलेल्या पैशांतून शैक्षणिक साहित्य द्या असं आव्हानही घरोघरी जाऊन केले. माझ्या शाळेमध्ये सगळे उपक्रम राबवत असतो आणि प्रत्येक उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो. विद्यार्थी खूप आवडीने हे उपक्रम करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यांच्या अंगातील कलागून उभारुन येतात. तसेच यामुळे विद्यार्थी इतर विषयात ही आनंदाने जलदगतीने अध्ययन करत असतात. या सर्व कामांची विद्यार्थी संचयिका तयार करतो प्रत्येक विद्यार्थ्याची फाइल असते आणि त्या फाईलमध्ये हे संपूर्ण वर्षाचं काम ठेवले जाते.
- दिलीप गावीत, मुख्याध्यापक, राजिप शाळा, धोंडसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com